मुलांच्या पोटात जंत झालेत हे कसं ओळखावं? स्पष्ट जाणवतात लक्षणं
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
लहान मुलांच्या पोटात जंत होणं ही अत्यंत सामान्य बाब आहे. मुलांच्या पोटात जाणाऱ्या अन्नपदार्थांमधील पोषक तत्त्व खाऊन हे किडे मोठे होतात. जंतांमुळे पोटात विविध विकार उत्पन्न होऊ शकतात, त्यामुळे हे जंत वेळीच बाहेर पडून मुलांचं पोट साफ राहणं अत्यंत आवश्यक असतं. (रुपांशू चौधरी, प्रतिनिधी)
advertisement
मुलांच्या पोटात प्रामुख्यानं टेपवार्म्स, राउंड वार्म्स, पिन वार्म्स, थ्रेडवार्म्स पाहायला मिळतात. खरंतर पोटात जंत झाले आहेत, याची मुलांमध्ये काही लक्षणंही जाणवतात, जसं की, त्यांना सतत थुंकी येणं, त्यांच्या शीच्या जागी खाज येणं, पोटात दुखणं, मुलं अचानक बारीक किंवा जाड होणं, त्यांना अशक्तपणा येणं, त्यांची चिडचिड होणं, इत्यादी.
advertisement
advertisement
advertisement





