advertisement

BMC Shiv Sena Shinde: आदित्य ठाकरेंचा माजी शिलेदार आता बीएमसीत शिंदेंचा 'सेनापती', कोणाची गटनेतेपदी वर्णी?

Last Updated:

BMC Shiv Sena Shinde: मुंबई महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा पेच सुटत असतानाच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली रणनीती स्पष्ट करत मोठा निर्णय घेतला आहे

आदित्य ठाकरेंचा माजी शिलेदार आता बीएमसीत शिंदेंचा 'सेनापती', कोणाची गटनेतेपदी वर्णी?
आदित्य ठाकरेंचा माजी शिलेदार आता बीएमसीत शिंदेंचा 'सेनापती', कोणाची गटनेतेपदी वर्णी?
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा पेच सुटत असतानाच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली रणनीती स्पष्ट करत मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून २९ नगरसेवकांची गट नोंदणी होणार असून राष्ट्रवादी अजित पवार गटदेखील शिंदे गटासोबतच गट म्हणून नोंदणी करण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाने आपल्या गटनेत्याची निवड केली आहे. कधीकाळी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे अमेय घोले हे शिंदे गटाचे मुंबई महापालिकेत नेतृत्व करणार आहेत.
शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची बैठक पार पाडली. यावेळी एकमताने अमेय घोले यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली. अमेय घोले हे दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मागील महापालिकेत ते आरोग्य समितीवर होते.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर घोले यांनी काही महिन्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अमेय घोले हे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवा सेनेच्या कोअर कमिटीमधील सदस्य होते. मात्र, गणेशोत्सवाच्या दरम्यान घोले यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला.
advertisement
मुंबई महापालिकेचे नियम, वैधानिक समित्यांचे कामकाज आणि प्रशासकीय पेच सोडवण्याचा त्यांचा अनुभव शिंदे गटासाठी मोलाचा ठरणार आहे. शिंदे गटात अमेय घोले यांच्यासह इतरही काही अनुभवी सदस्य नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
२९ नगरसेवकांच्या या गटाची नोंदणी करत शिंदेंच्या शिवसेनेने महापालिकेत आपले स्वतंत्र अस्तित्व आणि ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याशिवाय, राष्ट्रवादी अजित पवार गटाचीदेखील साथ त्यांना लाभण्याची शक्यता आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करताना सत्तेचे समतोल राखण्यासाठी आणि महत्त्वाच्या समित्यांवर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी अमेय घोले यांची गटनेता म्हणून भूमिका अत्यंत निर्णायक असेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Shiv Sena Shinde: आदित्य ठाकरेंचा माजी शिलेदार आता बीएमसीत शिंदेंचा 'सेनापती', कोणाची गटनेतेपदी वर्णी?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement