सावधान! सैंधव मीठ खात असाल, तर हार्ट अन् किडनीवर होईल परिणाम; डाॅक्टर काय सांगतात?
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
सेंधव मीठाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामध्ये आयोडिनचे प्रमाण कमी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने, हायपरकलेमियाचा धोका वाढतो. हायपरकलेमियामुळे...
सैंधव मीठ (rock salt) कोणाला आवडत नाही? अनेक लोकांना सैंधव मीठ खायला खूप आवडते. पण तुम्हाला माहित आहे का की सैंधव मिठाचे दीर्घकाळ सेवन काही लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. जे लोक आधीच काही आरोग्य समस्यांनी त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी ते विषारी देखील ठरू शकते. सैंधव मिठामध्ये आयोडीन कमी आणि पोटॅशियम जास्त असते, ज्यामुळे हायपरकेलेमिया (hyperkalemia) होऊ शकतो.
advertisement
हायपरकेलेमिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तातील पोटॅशियमची पातळी सामान्यपेक्षा जास्त होते, जी हृदय, स्नायू आणि नसांसाठी धोकादायक असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे तुम्हाला गलगंड (goiter) देखील होऊ शकतो. सैंधव मिठाचा मूत्रपिंड (kidneys) आणि हृदयावर वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत तुम्ही ते पांढऱ्या आणि सैंधव मिठाच्या मिश्रणाने खावे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


