Egg Storage : अंडी किती दिवसांत एक्स्पायर होतात? दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी 'हे' आहेत बेस्ट उपाय
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Does eggs have expiry date : हिवाळ्यात लोक अंतर्गत उष्णता आणि प्रथिनांसाठी जास्त अंडी खातात. वारंवार अंडी खरेदी करण्याचा त्रास टाळण्यासाठी बरेच लोक एका महिन्यासाठी संपूर्ण कॅरेटच घरी आणतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की तुम्ही जी अंडी खाणार आहात, ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत की नाही? त्यांनाही एक्स्पायरी असते का? ते फ्रेश कसे ठेवतात? चला जाणून घेऊया..
advertisement
advertisement
advertisement
अंडी किती जुनी असते : कवच असलेले अंडे 3-5 आठवड्यांसाठी खाण्यास सुरक्षित असते. अंडी त्याच्या कवचासह फ्रिझरमध्ये साठवण्याची शिफारस केलेली नाही. अंडी अनिश्चित काळासाठी फ्रीजरमध्ये ठेवता येतात. परंतु विशिष्ट कालावधीनंतर त्यांची गुणवत्ता कमी होण्यास सुरुवात होईल. तसेच तुमचा फ्रीजर 0°F (-18°C) पेक्षा कमी तापमानात असल्याची खात्री करा.
advertisement
advertisement
advertisement











