Yashasvi Jaiswal : टीम गंभीरची पण चर्चा रोहित-विराटची! जयस्वालच्या VIDEO ने ड्रेसिंग रूमचं वातावरण तापणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
यशस्वी जयस्वालचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून टीम गंभीरची पण चर्चा रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अशीच चर्चा आहे. त्यामुळे या व्हिडिओने ड्रेसिंग रूममधलं वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Yashasvi Jaiswal on Rohit Sharma And Virat Kohli : भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी20 मालिका सूरू आहे. या मालिकेत दुसरा सामना आज न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी यशस्वी जयस्वालचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून टीम गंभीरची पण चर्चा रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अशीच चर्चा आहे. त्यामुळे या व्हिडिओने ड्रेसिंग रूममधलं वातावरण तापण्याची शक्यता आहे.
यशस्वी जयस्वालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये यशस्वी जयस्वाल रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जयस्वाल म्हणतो, ज्यावेळेस मी माझ्या इनिंगला सूरूवात केली. तेव्हा थोडा मी नर्वस होतो. कारण मी फक्त दोनच सामने खेळले होतो आणि शतकासाठी प्रयत्न करत होतो. या दरम्यान रोहित शर्मा माझ्याशी खूप वेळ बोलला, मला त्यांनी समजावण्याचाही प्रयत्न केला. कसा खेळू शकतोस? काय करू शकतोस? असे जयस्वालने सांगितले. जयस्वाल आजतकच्या अजेंडा कार्यक्रमात बोलत होता.
advertisement
Yashasvi Jaiswal talking about Rohit Sharma. 🫡 pic.twitter.com/g6RL8Fifgh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 11, 2025
या दरम्यान माझ्यावर प्रेशर देखील होते. कारण खूप सारे बॉल डॉट जात होते.त्यामुळे चांगल्या रनरेटने धावा काढणे देखील गरजेचे होते. त्यामुळे त्यांनी मला धीर दिला आणि म्हणाले, तु खेळ आरामात आणि मी रिस्क घेतो.त्यामुळे तुम्ही बघू शकता रोहित शर्माच हृदय किती मोठं आहे. त्यामुळे ते (रोहित शर्मा) जास्त रिस्क घेत होते, कारण मी खेळत राहावं, अशी मैदानावरील आठवण यशस्वी जयस्वालने सांगितली.
advertisement
विराट पाजी देखील असे मदत करायचे. मैदानात आल्यावर चांगले सल्ले द्यायचे, असे यशस्वी जयस्वाने सांगितले. दरम्यान जयस्वालने तिसऱ्या वनडे सामन्यात शतकीय खेळी केली होती. यावेळी त्याच्यासोबत मैदानावर विराट कोहली होता.
दरम्यान रोहित विराट आता वनडेपूर्ते मर्यादित राहिल्याने सर्वा फोकस गंभीरवर गेला आहे. गंभीर बोलले ती पूर्वदिशा असं सगळं ड्रेसिंग रूममध्ये चालतं त्यामुळे टीम देखील गंभीरचीच झाली आहे. पण असे असून देखील युवा खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माचीच नाव काढताना दिसतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2025 4:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Yashasvi Jaiswal : टीम गंभीरची पण चर्चा रोहित-विराटची! जयस्वालच्या VIDEO ने ड्रेसिंग रूमचं वातावरण तापणार










