Health Tips: चाळीशी आलीये, बिनधास्त राहा; फॉलो करा ‘या’ टिप्स, आजारपण पळेल दूर
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Diet tips to be healthy after 40 in Marathi: चाळीशीनंतर विविध प्रकारचे आजार डोकं वर काढू लागतात. त्यामुळे चाळीशीपासून आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते. जाणून घेऊयात आयुष्याच्या ‘या’ विशेष टप्प्यात स्वत:ला फिट ठेवण्यासाठीच्या काही टिप्स्, ज्यामुळे तुम्ही म्हातारपणातही निरोगी राहू शकाल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या वयात मानसिक आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचं ठरतं. हा आपल्या वयाचा असा टप्पा असतो की कौटुंबिक किंवा व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे आपले माघारी फिरण्याचे रस्ते बंद झालेले असतात. त्यामुळे तणाव आणि चिंता वाढू लागतात. जर योग्य पद्धतीने या गोष्टी हाताळल्या गेल्या नाही तर त्याचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते.
advertisement
advertisement
आधी सांगितल्या प्रमाणे चाळीशीनंतर पचनक्रिया मंदावते. त्यामुळे अरबट चरबट खाण्यापेक्षा सकस आणि पौष्टिक आहार घेणं महत्त्वाचं ठरतं. खाण्याच्या चांगल्या सवयींची अवलंब नाही केल्यास पचनाचे विकार होण्याची भीती असते. त्यामुळे फास्ट फूड आणि जंक फूड टाळून आहारात ताजी फळं, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.