Ants : अनेक प्रयत्न करूनही मुंग्या घरातून जायचं नाव घेत नाहीत? वापरा 5 टिप्स, मुंग्या जातील निघून

Last Updated:
अनेकदा घरात असंख्य मुंग्या दिसतात, अशावेळी त्यांना घालवण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. परंतु बऱ्याचदा अनेक प्रयत्न करून देखील मुंग्या जायचं नाव घेत नाहीत अशावेळी काही घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.
1/5
मुंग्या घालवण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता. यासाठी एका लिंबाच्या रसात तीन पट पाणी मिसळून स्प्रे बाटलीत भरावे. जिथे मुंग्या दिसतील तिथे हे पाणी शिंपडा. असे केल्याने मुंग्या पळून जातील आणि पुन्हा दिसणार नाहीत.

advertisement
2/5
जर तुम्ही मुंग्या घालवण्यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधत असाल तर व्हाईट व्हिनेगर तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. स्प्रे बाटलीमध्ये व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात भरा. हे पाणी मुंग्यांवर शिंपडल्यास मुंग्या मारून जातात, मग मेलेल्या मुंग्यांना तुम्ही कचऱ्याच्या सुपात भरून टाकून द्या.

3/5
मुंग्या घालवण्यासाठी आणखी एक रामबाण उपाय म्हणजे 'काळी मिरी'. मुंग्यांना काळ्या मिरीचा वास अजिबात आवडत नाही, तेव्हा ज्याठिकाणी जास्त मुंग्या आहेत तेथे काळीमिरी टाका.

4/5
मुंग्यांना किचनपासून किंवा अन्नापासून दूर ठेवण्यासाठी, किचनमध्ये काही ठिकाणी मीठ शिंपडा. यामुळे मुंग्या अन्नाजवळ येत नाही तसेच जर तुम्हाला मुंग्या मारायच्या असतील तर त्यांच्यावर मीठाचे पाणी शिंपडा असे त्यामुळे डिहायड्रेशन होऊन मुंग्या मरतात.

5/5
कॉफीचा वापर मुंग्यांना घालवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. तेव्हा तुम्ही मुंग्यांवर कॉफी ओतू शकता किंवा कॉफी पाण्यात मिसळून हे पाणी मुंग्यांवर फवारू शकता.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement