7 Good habits for healthy heart: दीर्घायुषी व्हायचं आहे ? मग करा 'हे' सोपे 7 उपाय, सहज गाठाल वयाची शंभरी

Last Updated:
7 good habits for healthy heart: आपल्याला आठवत असेल साधारण 20-25 वर्षांपूर्वी जेव्हा आपले आई-वडिल ज्येष्ठांच्या पाया पडायचे तेव्हा त्या व्यक्ती त्यांना आशीर्वाद द्यायच्या, आयुष्यमान भवं. किंवा एखाद्या व्यक्तीची आठवण आली आणि अचानक ती व्यक्ती समोर आली की, आपण आजही म्हणतो शंभर वर्ष जगणार. गेल्या काही वर्षांपर्यंत वयाची 90 -100 वर्षांपर्यंत जगणं अगदी सहज शक्य होतं. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि धावपळीत 100 काय कोणी 50 वर्ष जगेल याची शाश्वती नाही. मात्र आम्ही तुम्हाला काही टिप्स देतोय. त्या टिप्स् जर तुम्ही वापरल्या आणि तुम्हाला असलेल्या चुकीच्या सवयी तुम्ही सोडल्या तर तुम्हाला दीर्घायुषी होऊन वयाची नव्वदी, शंभरी गाठणं सहज शक्य होऊ शकतं.
1/7
दीर्घायुषी होण्यासाठी तुमचं हृदय सुस्थितित असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या हृदयाला फिट ठेवण्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागणार आहे. निमयित व्यायामाने रक्तदाब नियंत्रित राहून आणि रक्ताभिसरण सुधारायला मदत होते. ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते. तुम्ही दररोज किमान 30 मिनिटं चालतात किंवा, सायकल चालवली किंवा पोहण्याचा व्यायाम जरी केला तरी तो तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
7 दीर्घायुषी होण्यासाठी तुमचं हृदय सुस्थितित असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या हृदयाला फिट ठेवण्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागणार आहे. निमयित व्यायामाने रक्तदाब नियंत्रित राहून आणि रक्ताभिसरण सुधारायला मदत होते. ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते. तुम्ही दररोज किमान 30 मिनिटं चालतात किंवा, सायकल चालवली किंवा पोहण्याचा व्यायाम जरी केला तरी तो तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
advertisement
2/7
हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पौष्टिक आहार खूप महत्त्वाचा ठरतो. तुमच्या जेवणात फळं, भाज्या, प्रथिनं आणि खनिजं असलेल्या पदार्थांचा समावेळ करा. ज्यामुळे तुमच्या धमन्यांचं आरोग्य सुधारून हृदयविकारांना दूर ठेवता येईल.

3/7
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने केल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येऊन हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी मद्यपान बंद करणं हे फायद्याचं आहे.
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने केल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येऊन हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी मद्यपान बंद करणं हे फायद्याचं आहे.
advertisement
4/7
धूम्रपानामुळे कॅन्सरचा धोका तर आहेच. मात्र धुम्रपानामुळे फुफ्फुसं निकामी होण्याची भीती असते. सततच्या धुम्रपानामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी देखील कमी होते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते ज्यामुळे हृदयावर ताण येतो. चेन स्मोकिंगमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.

5/7
दिवसभरात नियमित अंतराने पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण योग्यरित्या व्हायला मदत होते. ज्यामुळे रक्त जाड होऊन रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका टळतो.
दिवसभरात नियमित अंतराने पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण योग्यरित्या व्हायला मदत होते. ज्यामुळे रक्त जाड होऊन रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका टळतो.
advertisement
6/7
अपुरी झोप किंवा वेळी अवेळी झोपणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी धोक्याचं आहे. चांगली झोप न मिळाल्याने वजन वाढण्याची भीती असते. याशिवाय अपुऱ्या झोपेमुळे हृदयाची गती बदलून हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुषी होण्यासाठी रोज किमान 8 ते 10 तासांची झोप आवश्यक आहे.

7/7
दीर्घायुषी होण्यासाठी नियमितपणे आरोग्य तपासण्या करणं आवश्यक आहे. ज्यामुळे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहासारख्या गंभीर आजाराचं निदान वेळीच होऊन औषधोपचार सहज शक्य होऊ शकतात.
दीर्घायुषी होण्यासाठी नियमितपणे आरोग्य तपासण्या करणं आवश्यक आहे. ज्यामुळे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहासारख्या गंभीर आजाराचं निदान वेळीच होऊन औषधोपचार सहज शक्य होऊ शकतात.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement