Marathi Kavita : जगण्यात नवा आनंद आणि प्रेरणा आणतील लेखकाचे शब्द, या मराठी कविता एकदा वाचाच!

Last Updated:
Marathi Kavita : आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा सर्वकाही कठीण वाटते, वेळ सहजासहजी जात नाही, फक्त निराशा जाणवते. अशा परिस्थितीत एकतर व्यक्ती तणावग्रस्त होते किंवा सर्वकाही सुरळीत करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यास तयार असते. तुम्हीही याच टप्प्यातून जात असाल किंवा तुमच्या जवळची व्यक्ती वाईट काळातून जात असेल तर या कविता तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढू शकतात.
1/10
“ओळखलत क सर मला?’ पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी..क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, ‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.. माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला.. ‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.. कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे.. पडकी भिंत बांधतो आहे, चिख्लगाळ काढतो आहे, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा.. पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा ! - कुसुमाग्रज

advertisement
2/10
“रात्र थांबवुनी असेच उठावे, तुझ्यापाशी यावे क्षणासाठी! डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेटी आणि दिठी दिठी शब्द यावे! तूही थेंब थेंब शब्दापाठी द्यावा, अर्थ ओला व्हावा माझ्यासाठी आणि उजाडता पाठीवर ओझे, वाटेपाशी तुझे डोळे यावे!” - ग्रेस

3/10
मी खरेच दूर निघालो, तु येऊ नको ना मागे.. पाऊस कुठेतरी वाजे, हुदयाचे तुटती धागे.. खोल उठे काळाचा गहिवर, जळे सखीची चिता.. एक विराणी घेउन मृत्यु, सदैव फ़िरतो रिता.. ओंजळीत स्वर तुझे अन स्वरात श्वास तुझा.. क्षितिजाच्या कठड्‌यावर कललेला भास तुझा, ग्लानीत भास माझे झाले विदग्ध सत्य आई तुझ्या मुलातिल हा एवढाच संत - ग्रेस

4/10
मी कुठे म्हणालो परी मिळावी! फक्त जरा बरी मिळावी.. नाई, प्रयत्न मनापासून आहेत, मग किमान एक तरी मिळावी.. स्वप्नात तश्या खूप भेटतात, कधीतरी खरी मिळावी.. हवी हवीशी एक जखम, एकदा तरी उरी मिळावी.. गालावर खळी नको तिच्या, फक्त जरा हसरी मिळावी.. चंद्रा इतकी सुंदर नकोच, फक्त जरा लाजरी मिळावी.. मी कुठे म्हणालो परी मिळावी! फक्त जरा बरी मिळावी.. - मंगेश पाडगावकर.

5/10
पाखरांना ठाऊक असतं.. बाजारात गळा विकून, आपलं स्वरं गाणं कधी गाता येत नाही.. सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून, आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही. - मंगेश पाडगावकर

6/10
एकटा बरा आहे येथ मी खरा आहे.. संगती नको कोणी कोवळा झरा आहे.. गुज संगती पक्षी हासती धरा आहे.. फुलपाखरांची या लाडकी तर्हा आहे.. शांत या ढगांवरती रंग साजरा आहे.. स्पर्श ते नको त्यांचे ज्यांवरी भरा आहे.. बोलतो स्वतःशी मी शब्द हा जरा आहे - मंगेश पाडगावकर.

7/10
कधी आठवण लपलेली असते, हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते.. वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते.. सागराच्या अथांग निळाईत तर कधी ती लपलेली असते.. बहरलेल्या चैत्रपालवीत.. या साऱ्यांभोवती फिरत असतो, श्वास आपला मंद धुंद आणि यातूनच मग दरवळतो, तो आठवणीचा बकुळगंध - शांता शेळके

8/10
'तुझा' आणि 'तुझ्यासाठी' शब्द सारे खोटे, सरी फक्त क्वचित कधी बिलगणारी बोटे, बिलगणारी बोटे तीही बिहगून सुध्दा, दूर खोल खोल भुयारात कण्हणारे सूर, दूर दूरच्या ओसाडीत भटकणारे पाय, लयेमागील एकाकीपण कधी सरते काय? - शांता शेळके

9/10
अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिन, झोका झाडाले टांगला.. पिलं निजली खोप्यात, जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव, जीव झाडाले टांगला.. खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा... - बहिणाबाई चौधरी

10/10
नको नको ज्योतिषा, माझ्या दारी नको येऊ.. माझे दैव मला कळे, माझा हात नको पाहू.. धनरेषांच्या चन्यांनी, तळहात रे फाटला.. देवा तुझ्याबी घरवा, झरा धनाचा आटला.. म्हणे नशिबाचे नऊ ग्रह, तळहाताच्या रेघोट्या.. बापा नको मारू थापा अशा उगा खऱ्या खोट्या - बहिणाबाई चौधरी

Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement