Morning Routine : लिंबू पाण्याने करा दिवसाची सुरुवात, 15 दिवसात शरीराला होतील हे 5 मोठे फायदे!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
लिंबूपाणी एक पेय आहे, जे प्रत्येक ऋतूमध्ये लोकांना आवडते. काही लोक कोमट पाण्यात लिंबू घालतात, तर अनेकांना थंड पाण्यात लिंबू घालण्यात मजा येते. मात्र तुम्हाला माहितीये? तुम्ही दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने केली तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते.
advertisement
हायड्रेशन : शरीर हायड्रेटेड राहणे फार महत्वाचे आहे. निर्जलीकरणामुळे डोकेदुखी, चक्कर येणे आणि थकवा येऊ शकतो. बीबीसी गुड फूडच्या रिपोर्टनुसार, लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. रोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटू शकते. तुम्ही लिंबू थंड किंवा गरम पाण्यात मिसळून पिऊ शकता.
advertisement
व्हिटॅमिन सी : लिंबू हे व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्त्रोत मानला जातो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्वाचे मानले जाते. मजबूत प्रतिकारशक्तीमुळे रोगांचा धोका काही प्रमाणात कमी होतो. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, लिंबू काही लोकांना सर्दीपासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. विशेषत: जे लोक शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय असतात.
advertisement
त्वचा चमकवते : लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्स त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने त्वचा सुधारते. व्हिटॅमिन सी शरीराला कोलेजन तयार करण्यास मदत करते, जे त्वचा सुधारण्यास मदत करते. 2016 मध्ये झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, लिंबूवर्गीय फळांचा ज्युस प्यायल्याने त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लिंबू पाणी पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी. यावेळी लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. 2019 मधील एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की लिंबूमध्ये असलेले पॉलीफेनॉल आतडे निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. जर तुम्हाला पचनाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर लिंबू पाण्याचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो. यामुळे आतड्यांचे आरोग्यही सुधारेल.
advertisement
लिंबू पाणी पिणे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित मानले जाते. मात्र काही लोकांनी लिंबूपाणी पिताना काळजी घ्यावी. अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, दातांच्या समस्या असलेल्या लोकांनी लिंबू पाण्यापासून दूर राहावे. लिंबू पाण्याचे जास्त सेवन केल्याने दातांच्या समस्या वाढू शकतात. याशिवाय लिंबू पाण्याने छातीत जळजळ होण्याची समस्याही वाढू शकते.








