Cucumber health benefits: आला उन्हाळा, तब्येत सांभाळा, उन्हाळ्यासाठी फायद्याचा ठरेल ‘हा’ हिरवागार पदार्थ

Last Updated:
Health benefits of Cucumber in Marathi: बदलत्या वातावरणामुळे फेब्रुवारी महिन्यातच वैशाख वणव्याच्या झळा लागू लागल्या आहेत. अशा स्थिती शरीराला थंडावा देण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी हे उन्हाळ्यातलं एक सुपरफूड ठरू शकतं. आपल्यापैकी अनेकांना काकडी आवडते. आपल्यापैकी अनेक जण वर्षभर काकडी खात असतात. मात्र उन्हाळ्यात काकडी खाणं हे एका औषधाप्रमाणे ठरू शकतं. जाणून घेऊयात उन्हाळ्यात काकडी खाण्याचे फायदे.
1/7
काकडी ही दिसायला साधी जरी असली तरीही ती पोषकतत्त्वांचा खजीना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. काकडीत कार्बोहायड्रेट्स, प्रोटिन्स, फायबर्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि मॅगेनिज आढळून येतं.

advertisement
2/7
काकडी हा पाण्याचा उत्तम स्त्रोत मानला जातो. काकडीत जवळपास 90 ते 95  % टक्के पाणी आढळून येतं. उन्हाळ्यात घाम येऊन शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होण्याची भीती असते. अशा वेळी काकडी खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहायला मदत होते.

3/7
काकडीमध्ये लिग्नान्स, पॉलीफेनॉल भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय काकडीमध्ये क्युकरबिटासिन असतं जे कॅन्सरच्या ग्रंथीची वाढ रोखतं. त्यामुळे काकडीच्या नियमित सेवनामुळे अंडाशय, गर्भाशय, स्तन आणि प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग होण्याची शक्यता मावळते.

4/7
काकडीत फिसेटिन नावाचं एक दाहक-विरोधी फ्लेव्होनॉल असतं जे मेंदूच्या आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जातं. यामुळे वयोमानपरत्त्वे होणारं मज्जातंतूचं आणि पेशींचं संरक्षण होऊन विसरभोळेपणाचा त्रास कमी होऊ शकतो.

5/7
काकडीमध्ये शक्तीशाली अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतं. जे शरीराचं मुक्त रॅडिकल्सपासून रक्षण करतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतात.

6/7
काकडीमुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकायला मदत होते. यामुळे काकडी एक नैसर्गिक शक्तिशाली मूत्रवर्धक ठरते. काकडीच्या नियमित सेवनामुळे मूत्रमार्गाच्या समस्या दूर होऊन किडनींचं आरोग्य सुधारतं.

7/7
काकडीमध्ये व्हिटॅमिन के सारखे आवश्यक पोषक घटक असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचं ठरतात. यामुळे हाडांना मजबूती मिळून हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण घटतं.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement