महाबळेश्वरला फिरायला जाताय? तर ही 10 पर्यटनस्थळे पाहायला विसरू नका !
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महाबळेश्वरच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक पर्यटन स्थळे आहेत.
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून <a href="https://news18marathi.com/maharashtra/satara/">सातारा जिल्ह्यातील</a> महाबळेश्वरची ओळख आहे. घनदाट जंगले, उंच डोंगर, खोल दऱ्या, हिरवेगार भूप्रदेश, वाहणारे धबधबे आणि गुलाबी थंडी यामुळे पर्यटकांचा या ठिकाणाकडे ओढा असतो. महाबळेश्वरच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक पर्यटन स्थळे आहेत. याबाबतच आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
महाबळेश्वर हिल स्टेशनच्या मध्यभागी स्थित असलेले महाबळेश्वर मंदिर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असणारे हे मंदिर देशभरातील पर्यटकांना आकर्षित करते. मंदिराची वास्तुकला, अती गुंतागुंतीचे कोरीवकाम आणि आध्यात्मिक वातावरण यामुळे एक प्रसन्न वातावरण तयार होते. 16 व्या शतकात चंद्रराव मोरे घराण्याने हे मंदिर बांधल्याचं सांगितलं जातं.
advertisement
तापोळा या ठिकाणाला 'पश्चिम महाराष्ट्रातील मिनी काश्मीर' असे म्हणून ओळखले जाते. हे महाबळेश्वर मधील निसर्गरम्य गाव आहे. शिवसागर तलावाच्या काठावर वसलेले तापोळा हे मूळ नैसर्गिक परिसर आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. हिरवीगार जंगले, टेकड्या आणि शिवसागर तलावाच्या निळ्याशार पाण्याने वेढलेलं हे ठिकाण आहे.
advertisement
advertisement
महाराष्ट्रातील जुने महाबळेश्वर येथे पंचगंगा मंदिर आहे. हे भगवान कृष्णाला समर्पित आहे आणि कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. हे मंदिर सुमारे 4 हजार 500 वर्षे जुने असल्याचे मानले जाते. मूळतः तेराव्या शतकात यादव राजा सिंघनदेव याने ते बांधले होते. 17 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर त्याचे नूतनीकरण केले.
advertisement
टेबल लँड हे महाबळेश्वर जवळील पाचगणी या निसर्गरम्य हिल स्टेशनमध्ये वसलेले, पर्यटकांना एक अनोखा आणि मनमोहक अनुभव देणारे आकर्षक पठार आहे. आशियातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीय पठारांपैकी एक टेबल लँड विस्तीर्ण क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. सुमारे 4 हजार 550 फूट उंचीवर असणाऱ्या या ठिकाणाहून आजूबाजूच्या लँडस्केपचे विहंगम दृश्य दिसते.
advertisement
advertisement
महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी मॅप्रो गार्डन हे सर्वोत्तम ठिकाण आहे. स्ट्रॉबेरी उत्पादन ही मॅप्रो गार्डनची खासियत आहे. तिथे मध, चॉकलेट, गुलकंद यासारखे अनेक पदार्थ तयार होतात आणि त्याचा पर्यटक आस्वाद घेऊ शकतात. याशिवाय स्ट्रॉबेरी सॅलड, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरी शेकचाही इथं मनसोक्त आनंद लुटू शकता. दरवर्षी इथं स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल साजरा करण्यात येतो.
advertisement
वेण्णा लेक हे 28 एकर परिसरात पसरलेलं मानवनिर्मित तळं आहे. याची निर्मिती ही महाबळेश्वर, पाचगणी परिसरातील नागरिकांची पाण्याची गरज भागवण्यासाठी झाली होती. वेण्णा लेक चारही बाजूंनी हिरवळीनं नटलेलं आहे. या तळ्यावर मासे पकडणं, बोटिंग करणं, घोडे सफारी करणं याची मजाच काही वेगळी असते. या तळ्याकाठी सूर्यास्त पाहण्याचा आनंदही अविस्मरणीय असतो. संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी जाण्याचा प्लॅन केलात, तर तिथल्या निसर्गाचा अधिक मनसोक्त आनंद लुटता येईल आणि गुलाबी थंडीचा आस्वाद देखील घेता येतो.


