Warm Water Benefits : सकाळी रिकाम्या पोटी प्या कोमट पाणी, होतील 'हे' जबरदस्त फायदे!

Last Updated:
आपले शरीर बहुतांश पाण्याने बनलेले आहे. जर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर बरेच रोग शरीरात घर करू लागतात, याचाच अर्थ पाणी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीराची घाण साफ होते. कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव मूत्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीर शुद्ध होते. जाणून घ्या फायदे.
1/9
कोमट पाणी एक औषध म्हणून कार्य करते. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या मते, बहुतेक लोक दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करतात, जेणेकरून शरीराला ताजेतवाने वाटेल. त्याच वेळी, पाणी पिताना, सामान्य किंवा थंड पाणी पितात. आयुर्वेदानुसार हे चुकीचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

advertisement
2/9
सर्दी पडश्यात लाभदायक : सर्दी झाल्यावर कोमट पाणी पिण्याने कफ वितळतो. दिवसातून तीन किंवा चार वेळा कोमट पाणी घेतल्यास थंडीत आराम मिळेल. कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या केल्याने देखील खोकला बरा होऊ शकतो.

3/9
कोमट पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होते : वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीराची चयापचय वाढते, ज्यामुळे शरीरात अन्न, चरबी म्हणून गोळा होत नाही, तर वजन कमी करण्यास तसेच चरबी वितळवण्यास साह्य करते. सकाळी नियमितपणे कोमट पाणी प्यायल्याने काही दिवसात वजन कमी होऊ लागेल.

4/9
दूर होईल शरिरातील अपचनाची समस्या : सकाळी नियमितपणे कोमट पाणी प्यायल्याने काही दिवसात वजन कमी होऊ लागेल. आहारातील निष्काळजीपणामुळे बहुतेक लोकांना अपचन होते, कोमट पाणी पिणे यासाठी देखील फायदेशीर आहे. यासाठी सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित होतो. ते उपचार पोट साफ करते आणि बद्धकोष्ठता, पित्त आणि गॅसची समस्या देखील दूर करते. आपण नियमितपणे कोमट पाण्याचे सेवन केल्यास अपचनाची समस्या हळूहळू बरी होते.

5/9
शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकते कोमट पाणी : कोमट पाणी प्यायल्यामुळे, शरीरातील विषारी द्रव मूत्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीर शुद्ध होते तसेच त्यात ऊर्जेचा संचार होतो. वयोवृद्ध लोक जास्त शारीरिक श्रम किंवा व्यायाम करण्यास सक्षम नसतात म्हणून घामाच्या स्वरूपात विषारी पदार्थ त्यांच्या शरीराबाहेर पडत नाहीत. अशा परिस्थितीत ज्येष्ठांना कोमट पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

6/9
मासिकपाळीमध्ये देखील लाभदायक : मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना वेदना जाणवतात. या काळात कोमट पाणी पिण्यामुळे मासिक पाळीचा त्रास कमी होतो आणि मासिक पाळी नियंत्रित राहते.

7/9
रक्ताभिसरण उत्तम होते : myupchar.com चे डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या म्हणण्यानुसार, शरीरात उत्तम रक्ताभिसरण असणे महत्वाचे आहे. जर शरीराच्या सर्व अवयवांमध्ये रक्ताभिसरण होत नसेल, तर इतर शारीरिक समस्या देखील वेदनांसह उद्भवू शकतात. नियमितपणे कोमट पाणी घेतल्यास शरीरात रक्ताभिसरण योग्य प्रकारे होईल.

8/9
शारीरिक थकवा दूर होईल : ज्या लोकांना जास्त थकवा येण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी कोमट पाणी हे सर्वोत्तम उपचार आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे कोमट पाणी प्यायल्याने थोड्या दिवसात थकवा येण्याची समस्या दूर होईल.

9/9
त्वचेत तजेला आणते कोमट पाणी : कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीराची घाण साफ होते. याशिवाय हे रक्त स्वच्छ करण्यासही मदत करते. ते शरीराची त्वचा तजेलदार करते आणि कोरड्या त्वचेत आद्रता निर्माण करते. नियमितपणे कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीरात पाण्याचे संतुलन राहते, ज्यामुळे मुरुमांचा त्रास कमी होतो आणि त्वचेचे सौंदर्यही टिकते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement