advertisement

Lagna Muhurta : लग्नाचा मुहूर्त म्हणजे काय? तो चुकला तर काय काय होतं?

Last Updated:
Lagna Muhurta Importance In Marathi : सध्या लग्नाचा सिजन सुरु आहे. तुमच्या आजूबाजूचे केव्हा ओळखीचे कोणाचं तरी नक्कीच लग्न जमलं असेल. लव्ह मॅरेज असोत किंवा अरेंज, प्रत्येक लग्नात एक मुहूर्त काढला जातो. ज्या मुहुर्तावरच लग्न केलं जातं. पण आता प्रश्न असा की लग्नाचा हा मूहुर्त म्हणजे नक्की काय? आणि तो का काढला जातो? याचं उत्तर अनेकांना ठावूक नसेल.
1/9
आपल्याकडे विवाह हा एक शुभ संस्कार मानला जातो. विवाहकार्य निर्विघ्नपणे व्हावे, वधू-वरांचा भावी संसार सुखाचा व्हावा यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो.

2/9
विवाहाच्या वेळी आप्तेष्ट मित्रमंडळी वधू-वरांना शुभाशीर्वाद, शुभेच्छा देत असतात. विवाह मुहूर्तावर विवाह संस्कार करणे हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो.

3/9
 अनेक लोक विवाहाच्या शुभ मुहूर्ताच्या वेळेला खूप महत्त्व देतात. वैदिक पद्धतीने सर्व विवाहाचा विधी अगोदर करून घेतात आणि मंगलाष्टके म्हणून शुभ मुहूर्तावर वधू-वर एकमेकांना माळा घालतात. शेवटी विवाहकार्यात <a href="http://news18marathi.com/photogallery/lifestyle/wedding-hindu-rituals-why-not-leave-the-bride-and-groom-alone-after-the-haldi-ceremony-know-the-reason-in-marathi-mhpp-1092836.html">मुहूर्त वेळेबरोबरच हौस- मौज</a>, कुलाचार यांनाही सध्या विशेष महत्त्व दिले जाते. तो कौटुंबिक आनंद सोहळा असतो.
अनेक लोक विवाहाच्या शुभ मुहूर्ताच्या वेळेला खूप महत्त्व देतात. वैदिक पद्धतीने सर्व विवाहाचा विधी अगोदर करून घेतात आणि मंगलाष्टके म्हणून शुभ मुहूर्तावर वधू-वर एकमेकांना माळा घालतात. शेवटी विवाहकार्यात मुहूर्त वेळेबरोबरच हौस- मौज, कुलाचार यांनाही सध्या विशेष महत्त्व दिले जाते. तो कौटुंबिक आनंद सोहळा असतो.
advertisement
4/9
विवाह विधींमध्ये विवाह होम आणि गृहप्रवेशनीय होम हे दोन प्रमुख विधी सांगितलेले आहेत. विवाह होमामध्ये होम, पाणिग्रहण, लाजाहोम, अग्निप्रदक्षिणा, अश्मारोहण, सप्तपदी आणि ध्रुवादिदर्शन हे विधी असतात. गृहप्रवेशनीय होमामध्ये गृहप्रवेश, होम, वधूला उपदेश आणि देवता प्रार्थना हे विधी असतात. तसेच पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध, मंडपदेवता स्थापन, वाग्दान, सीमांतपूजन, ऐरणीपूजन इत्यादी धार्मिक विधीसंस्कारही केले जातात.

5/9
पंचांगे आणि कॅलेंडमध्ये अनेकदा विवाह मुहूर्त दिलेले असतात. हल्ली काही ग्रंथांचा आधार घेऊन चातुर्मासातही ‘काढीव मुहूर्त’ वेगळे देण्यात येतात. अडीअडचणींच्या वेळी या काढीव मुहूर्तावर विवाह कार्ये केली जातात.

6/9
आधुनिक कालात कधीकधी काही कार्यात विवाह मुहूर्ताची वेळही पाळली जात नाही. हेही खरे आहे. काही कार्यात वधूला मेकअप करायला, फोटो काढायला किंवा त्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागतो. त्यामुळे शुभ मुहूर्ताची वेळ चुकते.

7/9
काही वेळा मुलगा वरात घेऊन लग्नाला येत असतो. तेव्हा नाचत गाजत आल्यामुळे उशीर होतो. तर कधी मुहुर्ताच्यावेळी नवरा किंवा नवरीला उचलून धरण्याचा ट्रेंड आहे. ज्यामुळे देखील कधीकधी मुहुर्त चुकतो.

8/9
बऱ्याचदा विविह मुहुर्त फॉलो करण्याचा प्रयत्न केला जातो. पण काही ना अडचणीमुळे ते शक्य होत नाही. मुहुर्त चुकणे आता आधुनिक जगात सामान्य झालं आहे, ज्यामुळे लोक याकडे फारसं लक्ष देत नाहीत.

9/9
(वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement