Mangalsutra : विवाहित महिला का घालतात मंगळसूत्र, लग्नानंतर किती महत्त्वाचं असतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mangalsutra Facts : मंगळसूत्र हा फक्त दागिना नसून भारतीय स्त्रीसाठी ते तिचं ‘स्त्रीधन’ असतं. ते तिच्या सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं. लग्न झालेल्या जवळपास सर्व महिलांच्या गळ्यात मंगळसूत्र असतं.
हिंदू धर्माच्या विवाह संस्कृतीत लग्न आणि सौभाग्यवती स्त्रीच्या आयुष्यात मंगळसूत्राचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंगळसूत्राला सौभाग्याची खूण मानलं जातं. लग्नात नवरा आपल्या बायकोला देवा-ब्राम्हणाच्या साक्षीने घालतो. ज्यानंतर महिला ते आपल्या गळ्यातच ठेवतात. मंगळसूत्र हा फक्त दागिना नसून भारतीय स्त्रीसाठी ते तिचं ‘स्त्रीधन’ असतं. ते तिच्या सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं. लग्न झालेल्या जवळपास सर्व महिलांच्या गळ्यात मंगळसूत्र असतं.
advertisement
एका धाग्यात काळे मणी आणि सोनं अशी मंगळसूत्राची रचना असते. अगदी 'साधं मंगळसूत्र' म्हणजे डवळी, सोन्याचे मणी आणि काळ्या मणींचे दोन थर. असं मंगळसुत्राचं बेसिक डिझाइन असतं. काही ठिकाणी काळी पोत वाखाच्या दोऱ्यात, काळ्या गोफात किंवा सोन्याच्या तारेत गुंफून मंगळसूत्र तयार करण्याची प्रथा आहे. मंगळसूत्रालाच ‘गाठले’, ‘डोरले’, ‘गुंठण’ असेही शब्द महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आहेत. आता त्याच्या डिझाइन्स देखील बदलल्या आहेत.
advertisement
advertisement
खरंतर लग्नात नवऱ्याने नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून चालत आली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये मंगळसूत्र हा अलंकार विशेष प्रचलित आहे. अभ्यासकांच्या मते दक्षिण भारतातून हा अलंकार महाराष्ट्रात आला असावा. तामिळनाडू आणि केरळ या प्रदेशात ‘ताळी’ नावाचा एक सौभाग्य अलंकार वधूच्या गळ्यात बांधण्याची प्रथा आहे. त्यावरूनच ‘मंगळसूत्र’ बांधण्याची प्रथा सुरू झाली असावी.
advertisement
advertisement
advertisement
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौभाग्यवती महिलेच्या मनात केवळ तिच्या नवऱ्याबाबत प्रेम असतं, त्याच्याशिवाय ती इतर कोणत्याही पुरुषाचा विचार मनात आणत नाही. तिच्या या एकनिष्ठपणामुळेच तिच्या नवऱ्यावर येणारी सर्व संकटं तिच्या मंगळसूत्रामुळे नष्ट होतात. मंगळसूत्रामुळे स्त्रीच्या गळ्याला शोभा येतेच. शिवाय यमराजदेखील सौभाग्यवतीच्या मंगळसूत्राला वंदन करतात.