Toothbrush : दातांच्या स्वच्छतेतच लपला आहे धोका, ब्रशबद्दलची ही माहिती प्रत्येकाला माहित असायला हवी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ज्या टूथब्रशचा वापर आपण दररोज आरोग्य राखण्यासाठी करतो, तोच कधी आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
दररोज सकाळी उठल्यावर लोक सर्वात आधी काम करतात ते दात घासण्याचं. ही एक साधी सवय वाटली तरी ती आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. ब्रश केल्याने दातांवरील अन्नकण, जंतू आणि दुर्गंधी दूर होते, तसेच हिरड्या निरोगी राहतात. पण, ज्या टूथब्रशचा वापर आपण दररोज आरोग्य राखण्यासाठी करतो, तोच कधी आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
होय! एका संशोधनात असे आढळून आले आहे की तुमचा टूथब्रश म्हणजे अक्षरशः लाखो करोडो बॅक्टेरियांचा घर असतो. अभ्यासात समोर आले की एका टूथब्रशमध्ये 10 लाख ते सव्वा कोटी पर्यंत बॅक्टेरिया आणि फंगसच्या विविध प्रजाती आढळतात. हे सूक्ष्मजंतू ब्रशच्या जुन्या रेशांच्या फटींमध्ये जाऊन लपतात आणि केवळ पाण्याने धुतल्याने ते पूर्णपणे नष्ट होत नाहीत.
advertisement
advertisement
advertisement
मग या जंतूं पासून सुटका कशी करायची?शोधकांच्या मते, १% व्हिनेगर (सिरका) द्रावणात ब्रश भिजवणे हा बॅक्टेरिया कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. मात्र यामुळे ब्रशवर थोडासा आंबूस स्वाद राहतो, जो पुढच्या वेळी ब्रश करताना त्रासदायक वाटू शकतो.त्याशिवाय, एंटिसेप्टिक माउथवॉशमध्ये ब्रशच्या टोकाला 5 ते 10 मिनिटे भिजवणे हा देखील प्रभावी उपाय ठरतो.
advertisement


