Ahmednagar News : ठाण्यात पोलिसाचा दोघांवर गोळीबार, नगरमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये अटकेचा थरार, पाहा PHOTO

Last Updated:
ठाणे जिल्ह्यात दोघांवर गोळीबार करून पसार झालेल्या पोलीस आरोपीस अहमदनगर जिल्ह्यात जेरबंद करण्यात आले आहे. (हरीष दिमोटे, प्रतिनिधी)
1/5
ठाणे जिल्ह्यात दोघांवर गोळीबार करून पसार झालेल्या पोलीस आरोपीस अहमदनगर जिल्ह्यात जेरबंद करण्यात आले आहे. हत्यारबंद असलेला हा आरोपी एका बसमधून पळून जात असताना मोठ्या शिताफिने त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला आहे.

advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यातील पडघा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी रात्री सुरज ढोकरे या पोलिसाने स्वतःकडील रिव्हॉल्वरमधून दोघांवर अंधाधुंद गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. अजिम अस्लम सय्यद याला सहा गोळ्या लागल्या तर फिरोज शेख यास दोन गोळ्या लागल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

3/5
घटनेनंतर आरोपी पसार झाला. तो अहमदनगर जिल्ह्यात असल्याची माहिती डिवायएसपी संदिप मिटके यांना मिळाल्यानंतर त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. आरोपी नगरहून शिर्डीच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच सापळा रचला. आरोपी अहमदनगर नाशिक या बसमध्ये असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी कोल्हार बसस्थानकावर मोठ्या शिताफिने त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडे अत्याधुनिक अमेरीकन मेड रिव्हॉल्वर असल्याने तो गोळीबार करू शकत होता. मात्र, पोलिसांनी त्याला ही संधीच मिळू दिली नाही.

4/5
आरोपी सुरज ढोकरे हा अहमदनगर जिल्ह्यातील घारगाव येथील रहिवाशी असून सध्या तो मुंबई शिघ्र कृती दलात हवालदार पदावर आहे. त्याने दोघांवर का गोळीबार केला याची माहिती अजून पोलिसांना मिळाली नाही.

5/5
लोणी पोलिसांनी आरोपी सुरज यास ठाणे पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलीस तपासानंतर घटनेचे कारण स्पष्ट होणार आहे.

Angar Nagar Panchayat: राज्यात चर्चांमुळे गाजलेल्या अनगर नगराध्यक्ष निवडणुकीला ब्रेक! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नेमकं चाललंय काय?
गाजलेल्या अनगर नगराध्यक्ष निवडणुकीला ब्रेक! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, कारण काय?
  • गाजलेल्या अनगर नगराध्यक्ष निवडणुकीला ब्रेक! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, कारण काय?

View All
advertisement