Buldhana News : मढच्या जंगलात धक्कादायक घटना! झाडे करपली, डोळ्यांची जळजळ, 3 किमी दुर्गंधी, PHOTOS समोर

Last Updated:
Buldhana News : बुलढाणा ते अजिंठा महामार्गावरील बुधनेश्वर फाट्यासमोर जंगलात अज्ञातांनी केमिकलचे ड्रम फेकून दिल्याने दोनतीन किलोमीटरपर्यंत दुर्गंधी पसरली आहे. (राहुल खंडारे, प्रतिनिधी)
1/5
बुलढाणा ते अजिंठा महामार्गावरील बुधनेश्वर फाट्यासमोर मढच्या जंगलात दुपारच्या सुमारास अज्ञात आयशर वाहनातून धोकादायक केमिकलचे 10 ते 12 ड्रम फेकण्यात आले, हे ड्रम फेकून आयशर वाहन अजिंठ्याच्या दिशेने फरार झाला आहे.

advertisement
2/5
यापैकी 3 ते 4 ड्रम फुटून त्यातील केमिकलची गळती होऊन हा गॅस हवेत मिसळला. त्यामुळे परिसरातील लहान-मोठी सर्वच झाडे करपून गेली आहेत, तर या केमिकलमुळे 2 ते 3 किलोमीटर परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

3/5
डोळ्यात आणि त्वचेला जळजळ होत आहे. तसेच श्वास घ्यायला त्रास जाणवत आहे, यामुळे मानवी आरोग्यासह वन्य प्राण्यांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच धाडचे ठाणेदार नरेंद्र पेंदोर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बुलढाणा येथून नगरपालिकेचे अग्निशमन पथकाला बोलावून घेतले.

4/5
सदर भाग बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजी नगर आणि जळगाव या 4 जिल्ह्याच्या सीमेवर आहे. वनविभागाचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले दाखल झाले आहेत. या ड्रमवर असलेल्या लेबल वरून टेट्रा क्लोरो इथिलीन नावाचे हे केमिकल असल्याचं दिसून येत आहे, जे मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.

5/5
यासंदर्भात फरदापुर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. केमिकल कोणी आणि का टाकले याचा आता पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement