advertisement

Weather Alert: पुन्हा शेकोट्या पेटल्या, मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, कुठं थंडी तर कुठं...

Last Updated:
Weather update: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. हवेतील गारठा वाढला असून काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे.
1/5
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रसह मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. गेल्या आठवडाभरात मराठवाड्यात गारठा कमी झाला होता. आता मात्र वातावरणात बदल जाणवत असल्याने तापमानात घट होत आहे. परिणामी आता गारठा वाढला लागला आहे. आज 29 नोव्हेंबरला थंड वातावरण राहणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचा पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/5
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये दिवसभर कोरडे, स्वच्छ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यत आकाश धुसर राहील. तसेच कमाल तापमान 29 अंश तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच कमाल तापमानात दोन अंशाची घट होऊ शकते.

3/5
बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा चढ-उतार अधिक जाणवू शकतो. बीड जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. बीडचा पारा 29 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता असून रात्री किमान तापमान 17 अंश सेल्सिअसवर स्थिर राहील. तर हिंगोली आणि नांदेडमध्ये सामान्यतः थंडी काही प्रमाणात कमी असणार आहे.

4/5
लातूर व धाराशिव या जिल्ह्यात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तसेच येथील हवामान स्थिर असणार आहे. त्यामुळे गारठा येथे राहणार आहे. लातूरमध्ये दिवसा तापमान अंदाजे 29 अंश, तर रात्री 16 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज असून गारवा वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे.

5/5
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यासाठी शनिवारी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला नाही. मात्र काही ठिकाणी सौम्य ढगाळ वातावरण दिसू शकते. त्यामुळे रात्री- सकाळी थंडी अधिक जाणवण्याची शक्यता आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement