उत्तर भारतातून येतंय संकट, मराठवाड्यात पारा घसरला, आजचं हवामान अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Weather update: उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे मराठवाड्यातील तापमानात घट झाली आहे. थंडीचा जोर वाढला असून पारा घसरला आहे.
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. सलग सहा महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या पावसाळ्यानंतर अखेर पाऊस गायब झाला आहे, मागील आठवडाभरापासून मराठवाड्यात थंडीचा प्रभाव स्पष्टपणे दिसू लागला आहे. 12 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील हवामान स्थिती कशी राहील? जाणून घेऊ.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आकाश पूर्णपणे निरभ्र राहील. हवेतील ओलावा कमी झाल्यामुळे तापमानात झपाट्याने घट होत असून, थंडीचा कडाका वाढत आहे. विशेषतः पैठण, सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यांत दुपारी सूर्यप्रकाशाचे चटके बसत आहे तर सकाळ-संध्याकाळच्या वेळी गारठा अधिक जाणवत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11.8 तर बीडमध्ये 11.5 अंशांपर्यंत पारा घसरला आहे.
advertisement
जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात कोरडे वातावरण राहणार असण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका वाढला असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. तर लातूरमधील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात मागील चार दिवसांपासून तापमानात घट होत आहे. उत्तरेकडून येणारा थंड वाऱ्यामुळे थंडीचा गारठा वाढला आहे. गारठ्यामुळे सकाळच्या वेळी धुक्याचे सावट दिसत आहे. उर्वरित धाराशिव जिल्ह्यात वातावरण कोरडे राहणार आहे.
advertisement
तापमानात घट झाल्यामुळे नागरिक घरातील उबदार कपडे बाहेर काढू लागले आहेत. शाल, स्वेटर आणि जॅकेटच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक आता शेकोट्या पेटवताना दिसत आहेत. बदलत्या हवामानामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते आणि आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement


