आजचं हवामान: मराठवाड्यात पुन्हा मुसळधार, छ. संभाजीनगरला अलर्ट, बीड, जालन्यात काय स्थिती?
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा बदल जाणवत असून आज छत्रपती संभाजीनगरसह काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानामध्ये मोठी वाढ बघायला मिळत आहे. मराठवाड्यामध्ये देखील जून महिना सुरू झाल्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. यामुळे मराठवाड्यातील तापमानात मोठी वाढ झालेली आहे. 5 जून रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
नांदेड, हिंगोली आणि लातूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जून महिना सुरू झाल्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. 5 जून रोजी या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. या ठिकाणी तापमान 34 अंशावरती गेलेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली मशागतीचे कामे लवकर पूर्ण करून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.








