Marathwada Weather: मराठवाड्यात उन्हाचा तडाखा, 11 ते 4 घरीच थांबा, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Weather Alert: मराठवाड्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. आज तापमानाचा पारा 41 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात तापमानात मोठी वाढ झाली असून मराठवाड्यात देखील 16 आणि 17 एप्रिलला तापमानात लक्षणीय वाढ झालीये. उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे नागरिकांना उष्णतेचा तडाखा सहन करावा लागत आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या दोन दिवसांत मराठवाड्यातील कमाल तापमान 38 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाऊ शकते.
advertisement
advertisement
आज 17 एप्रिल रोजीही तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांना दुपारी 11 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव आणि उच्च दाबाचे क्षेत्र यामुळे तापमानात वाढ होत आहे. याचा परिणाम शेती आणि दैनंदिन जीवनावरही होत आहे.
advertisement
advertisement








