Marathwada Rain : मराठवाड्यात हवापालट, पाऊस पुन्हा झोडपणार, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
मराठवाड्यात आज 4 ऑगस्ट रोजी 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नांदेड, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांना सतर्कतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे असून येथील नागरिकांनी खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, या 5 जिल्ह्यांना कोणताही सतर्कतेचा अलर्ट हवामान विभागाने दिला नाही. मात्र हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समाधानकारक पावसाची येथील शेतकरी आतुरतेने वाट पाहत असून शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.
advertisement
वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक झालेल्या पावसात कांदा मार्केटमधील शेतकऱ्यांचा कांदा भिजला. उघड्यावर पडलेला आणि वाहनांत आणलेला खुला कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. वैजापूर बाजार समितीच्या आवारात नेहमीप्रमाणे शनिवारीही सुमारे 600 वाहनांतून शेतकऱ्यांचा कांदा विक्रीस आला होता. सकाळच्या सत्रात जवळपास 400 वाहनांचा लिलाव झाला. त्यानंतर दुपारनंतर दुसऱ्या सत्रात 4:30 ला कांदा लिलाव सुरू झाला; मात्र, पाच वाजेच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांची एकच धांदल उडाली. या पावसामुळे कांदा भिजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
advertisement