advertisement

Rain Alert: लातूर, धाराशिवला मुसळधार, मराठवाड्याला आज झोडपणार, 20 मेचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचं धुमशान सुरूच असून आज पुन्हा हवामान विभागाने इशारा दिला आहे. पुढील 24 तासांसाठी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
मराठवाड्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच वादळी पावसाचं धुमशान सुरू आहे. पुढील काही काळात पुन्हा वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज, 20 मे रोजी छत्रपती संभाजीनगरसह विविध जिल्ह्यांना मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अलर्ट दिला आहे.

2/5
मराठवाड्यात आज वादळी पावसाची शक्यता असून लातूर, धाराशिवला 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या काळात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

3/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तास मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

4/5
मराठवाड्यात पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरला 24 तासानंतर वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट असून इतर जिल्ह्यांत देखील 4 दिवस पावसाचा इशारा कायम असणार आहे.

5/5
वादळी पावसामुळे मराठवाड्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आज पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला असून शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तर नागरिकांना देखील हवामान पाहूनच बाहेर पडावं लागेल.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement