मकर संक्रांतीसाठी खणांना असते मोठी मागणी; कुंभार वाड्यात कसे बनतात खण पाहा PHOTOS

Last Updated:
मकर संक्रांतीच्या काळात बाजारपेठेत खणांना मोठी मागणी असते. त्यामुळे संक्रांतीचे खण बनवण्याची लगबग सुरू आहे.
1/6
मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कुंभार वाड्यात छोटे छोटे खण तयार करण्याची लगबग सुरू झालीय.

advertisement
2/6
मकर संक्रांतीच्या काळात खणांना मोठी मागणी असते. त्यामुळे धाराशिव तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील हनुमंत कुंभार यांच्या घरी देखील संक्रांतीचे खण बनवण्याची लगबग सुरू आहे.

3/6
हनुमंत कुंभार खण बनवण्यासाठी लागणारी माती पंढरपूरहुन आणतात. या मातीचे एक टिपर 30 हजार रुपयाला मिळते, तर तांबड्या मातीचे टिपर दहा हजार रुपयांना मिळते. खण बनवण्यसाठी कारखान्यावरून भुसा देखील विकत आणावा लागतो. त्यामुळे खण बनवण्यासाठीचे साहित्य खरेदीसाठी जवळपास 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च येतो.

4/6
संक्रात आणी वेळ अमावश्या या दोन सणांचे त्यांना एक ते दिड लाख रुपयांचे उत्पन्न होते, तर वेळ अमावस्या चे 50 हजार रुपयांचे उत्पन्न होते. याचं बरोब्बर उन्हाळ्यात माठ विक्रीतून एक लाख रुपये मिळतात वर्षाकाठी अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न होते, असं हनुमंत कुंभार सांगतात.

5/6
पारंपरिक व्यवसायात खण बनवण्यासाठी मी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केलाय. इलेक्ट्रॉनिक चाक खरेदी केले आहेत. चिखल तुडवण्याचे मशीनही ‌खरेदी केले आहे . त्यामुळे कष्टात बचत झाली आहे.

6/6
खण बनवण्यासाठी माती चाळून पाण्यात भिजवली जाते, त्यानंतर ती माती तुडवून एका चाकावर तुडवलेल्या चिखलाच्या गोळ्याला आकार दिला जातो आणि खण बनवले जातात. संक्रांतीच्या सणासाठी, खण, झाकण्या बनवल्या जातात तर उन्हाळ्यात माठ बनवले जातात आणि धाराशिव शहरात विक्री केली जाते, असंही हनुमंत कुंभार यांनी सांगितलं.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement