मंगळसूत्र-पाटल्या आताच खरेदी करून घ्या! दिवाळीपर्यंत आणखी महाग होणार सोनं, आजचे दर काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जागतिक मागणी वाढ, रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकन फेडरल बँक, रुपया घसरण यामुळे सोनं आणि चांदीचे दर दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता येथे उच्चांकावर पोहोचले आहेत.
advertisement
आगामी काळातही सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक बाजारपेठेत रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकन फेडरल बँकांचे कमी झालेले व्याजदर, रुपयाची डॉलरच्या तुलनेत झालेली घसरण आणि अमेरिकेत सुरू असलेले "शटडाउन" या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक देशांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी सुरू केली आहे.
advertisement
यामुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढली असून, दरात झपाट्याने वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. ७ ऑक्टोबरला सोन्याच्या बाजारात पुन्हा तेजी परतली आहे. सलग तीन दिवस चाललेली घसरण अखेर थांबली असून, काल संध्याकाळीच सोन्याचा भाव नव्या उच्चांकावर पोहोचला होता. ही तेजी आज सकाळपर्यंत कायम आहे.
advertisement
advertisement
advertisement