पारंपारिक शेतीला रामराम ठोकत ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून कमाल, जालन्यातील शेतकऱ्याने घेतलं 8 लाख रुपयांचे उत्पन्न
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि लागणारा खर्च, याचा वर्षाअंती हिशोब काढला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे कर्जाचा डोंगर उभा राहतो. म्हणून पारंपारीक असलेली कापुस, सोयाबीन, तूर, बाजरी, ज्वारी या पिकांपेक्षा वेगळी शेती करण्याचा विचार एका शेतकऱ्याने केला. अशोक धोंडीराम वायसे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी कृषी पदविका घेतली असून ते घनसावंगी तालुक्यातील घोंन्सी खुर्द येथील रहिवासी आहेत. आज जाणून घेऊयात त्यांची यशस्वी कहाणी. (नारायण काळे/जालना, प्रतिनिधी)
अशोक धोंडीराम वायसे यांनी सर्वत्र मागणी असलेल्या औषधी फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ड्रॅगेन फ्रुटची लागवड आपल्या शेतात केली आणि आता 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. अशोक धोंडीराम वायसे यांनी कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत ड्रॅगन फ्रुटची एक एकर क्षेत्रावर लागवड केली. या बाबत मंडळ कृषी अधिकारी संजय लोंढे यांनी शेतकरी अशोक वायसे यांच्या ड्रॅगन फ्रुट बाबतीत त्यांना वेळोवेळी माहिती दिली.
advertisement
या फळ पिकाला सर्वात कमी प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना जो पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे, त्यावर हे सर्वात मोठे उत्तर आहे. दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही ड्रॅगन फ्रुट हे फळपीक आपल्याला आपल्या भागात पीकविता येते. तसेच वातावरणीय दृष्ट्या खूप सक्षम पीक आहे. या पिकाला मार्केटमध्ये दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे.
advertisement
अशोक वायसे यांनी एक एकर क्षेत्रावर 23 ऑगस्ट 2021 रोजी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. लागवडीसाठी त्यांना एकरी 4 लाख रुपये खर्च आला. लागवड अंतर 10 बाय 7 फुट असे ठेवले. एकुण 2 हजार रोपे आणि 500 पोल त्यांना लागले. यासाठी त्यांनी रेड जम्बो नावाच्या वाणाची निवड केली. तिसऱ्या वर्षी म्हणजे मागील वर्षी त्यांना 4 टन उत्पादन झाले. तसेच यासाठी सरासरी दर 100 रुपये प्रतिकिलो मिळाला. या माध्यमातून त्यांना एकूण 4 लाख रुपयांचे उत्पादन झाले. यावर्षी दुपटीने 7 ते 8 टन उत्पादन मिळणार असल्याने 100 रुपये भावाने 7 ते 8 लाख रुपयांपर्यंत उत्पादन होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
ड्रॅगन फ्रूटला सर्वाधिक मागणी मुंबई, पुणे येथील मार्केटमधून आहे. शेतकरी अशोक वायसे हे क्रेट आणि बॉक्स अशा दोन्ही पॅकिंगमधून माल पुणे मार्केटला पाठवतात. या फळ पिकाला इतर फळ पिकाच्या तुलनेत खते, फवारणी, औषधे खूप कमी लागतात. हे फळपीक उष्ण कटिबद्ध प्रदेशातील आहे. त्याच्यावर सहजासहजी रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. आपण जेव्हा एखाद्या फळबागेची लागवड करतो. त्यावेळी त्या फळबागेला फळ धारणा येण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागतो. असे असताना ड्रॅगन फ्रुट या फळ पिकाचा कालावधी पाहिला तर बागेच्या लागवडीपासून सरासरी 12 महिन्यात आपण उत्पन्न घेऊ शकतो.
advertisement
शेतकरी अशोक वायसे यांच्या कार्याची दखल घेऊन 1 जुलै हा कृषी दिनानिमित्त घनसावंगीचे तालुका कृषी अधिकारी डॉ. सखाराम पवळ यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. ड्रॅगन फ्रुट निवडूंग वेल आहे. त्यामुळे कोणत्याही जनावरापासून या पिकाला धोका नाही. याचे उगमस्थान मध्य अमेरिका असून आता उष्ण प्रदेशातही उत्पादन घेतले जाते. झाडीची वेल छत्रीसारखी वाढत असल्याने त्याला द्राक्षासारखा आधार द्यावा लागतो. त्यामुळे शेतामध्ये स्तंभ (पोल) किवा बांबू उभारावे लागतात.
advertisement
advertisement