साताऱ्यात पारा घसरला! पश्चिम महाराष्ट्राला हुडहुडी, पुण्यातील अपडेट पाहिलं का?

Last Updated:
Weather Forecast: गेल्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली होती. आता पुन्हा पारा घसरला आहे. पाहा हवामानाचा अंदाज.  
1/5
पुणे शहरात पुन्हा एकदा चांगलीच थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे. आज तापमानात पुन्हा 14 अंशांनी घट झाली असून किमान तापमान 16 अंशांवर आलंय. तर कमाल तापमान 31अंश सेल्सिअस असणार आहे. पुणे शहरातील वातावरण सूर्यप्रकाशित राहणार आहे.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात वातावरण कोरडं राहणार आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून सातारकरांना गुलाबी थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे. आज पुन्हा किमान तापमानात 2 अंशांची घट झाली असून ते 14 अंशांवर आलं आहे. तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस असेल.

3/5
सांगली जिल्ह्यात आज वातावरण काही प्रमाणात ढगाळ राहील. तर काही ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाशित राहणार आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर आता पुन्हा थंडी जणवत आहे. किमान तापमान 17 अंशांपर्यंत खाली आलं असून कमाल तापमान 31 अंशांवर आहे.

4/5
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी दाट धुकं दिसत असून वातावरण अंशत: ढगाळ आहे. तर दुपारी तापमान तिशी पार असून उन्हाचे चटके जाणवत आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी पडून गेलेल्या पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण होत आहे. आज जिल्ह्यात 31 अंश कमाल तर 16 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

5/5
सोलापुरात गेले काही दिवस किमान तापमान 20 अंशांच्या पुढे गेले होते. परंतु, आता पुन्हा पारा घसरला असून थंडीचा जोर वाढला आहे. आज वातावरण सूर्यप्रकाशित राहणार असून कमाल तापमान 31 अंश सेल्सीअस तर किमान 17 अंश सेल्सिअस असेल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement