दसऱ्याला जोरधार! विदर्भातील 11 जिल्ह्यांबाबत महत्त्वाचं अपडेट, कुठं कोसळणार पाऊस?

Last Updated:
विदर्भात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वात जास्त फटका बसताना दिसून येत आहे. 
1/5
राज्यात परतीच्या पावसाचा जोर पुन्हा वाढल्याचं चित्र आहे. विदर्भात गेले काही दिवस नागरिकांना उकाडा सहन करावा लागलाय. आता मात्र विदर्भात जोरदार पाऊस होतोय. शुक्रवारी विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

advertisement
2/5
आज 12 ऑक्टोबरला विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 13 ते 15 ऑक्टोबरपर्यंत विदर्भात 11 जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी अगदी तुरळक पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

3/5
विदर्भात आजपासून पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

4/5
उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी वातावरण अंशतः ढगाळ राहून हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

5/5
कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या वेगळीच चिंता आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्याला सध्या मध्यम पावसाची आवश्यकता आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात सोयाबीन काढणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होण्याचा धोका आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement