काय सांगता...गायीने एकावेळी दिला 3 वासरांना जन्म, सर्व वासरं ठणठणीत!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
जुळी मुलं होणं हे आता सामान्य झालंय. परंतु एखाद्या स्त्रीने एकाच वेळी तीन बाळांना जन्म दिला की, आजही आश्चर्य व्यक्त केलं जातं. प्राण्यांबाबतही असंच आहे. (शुभम बोडके, प्रतिनिधी/सातारा)
advertisement
advertisement
साताऱ्यातील वाघोली गावचे रहिवासी राजेश जाधव यांच्या गायीला गोठ्यात तीळं झालं. ही माहिती पाहता पाहता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनी गाय आणि तिची वासरं पाहायला राजेश यांच्या गोठ्यात गर्दी केली. हजारो गायींमागून एखादी गाय एकाच वेळी तीन वासरांना जन्म देते, असं म्हटलं जातं.
advertisement
advertisement


