Satara : साताऱ्यात बाजीगर सिनेमासारखी घटना, बॉयफ्रेंडने प्रेयसीला इमारतीवरून खाली फेकलं, धक्कादायक कारण समोर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
वादानंतर प्रियकर ध्रृवने आरुषीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकलून दिले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी झालेल्या झटापटीत ध्रृवही जखमी झाला आहे.
advertisement
हरियाना येथील सोनिपत येथील ध्रृव छिक्कार असे ढकलून देणाऱ्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. प्रियकर आणि प्रेयसी कराड येथील कृष्णा मेडीकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. प्रेयसी आरुषी आणि ध्रृव असे दोघे दिल्लीत एकत्र शिक्षण घेत होते तेव्हा पासून या दोघांचे एकमेकावर प्रेम होते. त्या नंतर त्यांनी एकत्रच कराडातील मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
advertisement
advertisement
advertisement


