'दिलात झापुक झुपुक' आणि कॅटबरी; उदयनराजे बसले शिवेंद्रराजेंच्या कारमध्ये, साताऱ्यात वारं बदललं!
- Published by:sachin Salve
Last Updated:
आमदार शिवेंद्रराजे प्रथमच उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये आले होते. यावेळी उदयनराजेंनीही मोठ्या मनाने उदयनराजेंचं स्वागत केलं. यावेळी दोघांमध्ये गुप्त बैठक सुद्धा झाली. (सचिन जाधव, प्रतिनिधी)
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर होईल. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे, साताऱ्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले एकत्र पाहण्यास मिळाले आहे. विशेष म्हणजे, शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना कॅटबरी चॉकलेट भेट दिलं आहे. विशेष म्हणजे, दोन्ही राजेंनी कारमध्ये 'दिलात झापुक झुपुक वाजत राहतंय गं' गाणंही ऐकलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement