“बोललीस तर व्हिडिओ व्हायरल करेन!” मुंबईत व्यावसायिक महिलेला बंदुकीच्या धाकावर नग्न केलं, ऑफिसमध्येच फोटो-व्हिडिओ रेकॉर्डिंग
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Mumbai News: मुंबईत एका व्यावसायिक महिलेला बंदुकीच्या धाकावर नग्न करून चित्रीकरण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. त्यातच कोलकात्यातही महिलेला कारमध्ये ओढून नेऊन मद्य पाजत अत्याचार करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
मुंबईतील एका व्यवसायिक महिलेला नग्न करून बंदुकीच्या धाकावर चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेने कोणताही आवाज उठवला तर तिचे फोटो-व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देण्यात आल्याचे तिने पोलिसांपुढे सांगितले आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक सदस्याचे नाव तक्रारीत नमूद केले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रात्री सुमारे 9 वाजता महिला अॅपवर कॅबची वाट पाहत असताना एक कार थांबली. त्या कारमध्ये तीन जण होते, त्यापैकी एकाला ती तीन महिन्यांपासून ओळख होती. कार थांबताच तिला आत खेचण्यात आले. तिला जबरदस्तीने मद्य पाजण्यात आले, ज्यात कथितपणे ड्रग्सने मिसळलेले होते आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाला. नंतर आरोपींनी तिला मैदान परिसरात सोडून पळ काढला. महिलेची सुटका करण्यात आली आणि तिला उपचारासाठी SSKM रुग्णालयात दाखल करण्यात आले.


