Heart Attack: आता हार्ट अटॅकचे त्वरित होणार निदान, सोलापुरातील डॉक्टराने बनवले खास जॅकेट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Heart Attack: डॉक्टर गुरुनाथ परळे त्यांनी हार्ट अटॅकचे निदान करणारे जॅकेट बनवले आहे. बदलत्या जीवनशैली सवयीमुळे अगदी लहान वयोगटातील तरुणांमध्ये देखील हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे.
हार्ट अटॅकचे निदान करणारे जॅकेट बनवले आहे. बदलत्या जीवनशैली सवयीमुळे अगदी लहान वयोगटातील तरुणांमध्ये देखील हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. हेच लक्षात ठेवून डॉक्टर परळे यांनी या उपकरणाचे संशोधन केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली." width="1200" height="900" /> सोलापुरातील शहरातील प्रसिद्ध हृदयतज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे त्यांनी हार्ट अटॅकचे निदान करणारे जॅकेट बनवले आहे. बदलत्या जीवनशैली सवयीमुळे अगदी लहान वयोगटातील तरुणांमध्ये देखील हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. हेच लक्षात ठेवून डॉक्टर परळे यांनी या उपकरणाचे संशोधन केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
advertisement
हार्ट अटॅकचा निदान करण्यासाठी सर्वात प्राथमिक आणि महत्त्वाची चाचणी म्हणजे इसीजी परंतु गाव खेड्यात इसीजी मशीन देखील उपलब्ध नसल्याने हार्ट पेशंटला लवकर उपचार मिळत नाही. तर शहरात विशेष म्हणजे मेट्रो शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी भरपूर असते. त्यामुळे हार्ट पेशंटला हॉस्पिटलला पोहोचायला वेळ मिळत नाही. त्यामुळे या अनोख्या जॅकेटचे संशोधन केल्याचे डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी सांगितले.
advertisement
हार्ट अटॅकचं निदान करण्यासाठी इलेक्ट्रोकार्डियोग्राम (इसीजी) अतिशय गरजेचा आहे. पेशंटच्या घरच्या घरी इसीजी काढायचं सोय झाली. तर पहिल्या तासातला गोल्डन आवरचा फायदा घेऊन रुग्णांचा जीव कसा वाचवता येईल. छातीवर आणि पोटावर शोधलेल्या पॉईंट्सचे संशोधन शिकागो येथे 2020 मध्ये वर्ल्ड काँग्रेस ऑफ कार्तोलॉजी इन अमेरिकन कॉलेज ऑफ कॅटोलॉजी कॉन्फरन्समध्ये मांडण्यात आले होते.
advertisement
तसेच विविध अभ्यासाद्वारे हे पॉईंट नेहमी ईसीजी पॉईंट सारखेच असल्याचे सिद्ध झाले. जवळपास 1300 हून अधिक रुग्णांचा अभ्यास करून आणि पोटावरील असे पॉईंट शोधले. डॉक्टर गुरुनाथ परळे यांना ग्रामीण भागापर्यंत हे उपकरण पोहोचवायचे आहे. साधारणतः या जॅकेटची किंमत आठ ते दहा हजार रुपये पर्यंत असणार आहे. नुकतेच पेटंट मिळाले आहे.