वाद झाला, दारूच्या नशेत थेट खून केला, दुहेरी हत्याकांडांचा असा झाला पर्दाफाश

Last Updated:

जामखेडच्या तरुणाची हत्या केल्यानंतर सासवडमध्ये दुसरा खून करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

संदीप गिल (पुणे पोलीस अधीक्षक)
संदीप गिल (पुणे पोलीस अधीक्षक)
पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी एका धक्कादायक दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश करत आरोपीला अटक केली आहे. जामखेडच्या तरुणाची हत्या केल्यानंतर सासवडमध्ये दुसरा खून करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
सासवड शहरातील न्यू आनंद वाईन्सच्या मागील बाजूस असलेल्या एका अपूर्ण बांधकाम इमारतीत राजू दत्तात्रय बोराडे (वय ३८, रा. सासवड) यांचा गळा चिरलेला मृतदेह ९ डिसेंबर रोजी आढळून आला होता. दिवसाढवळ्या झालेल्या या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण सासवड परिसरात खळबळ माजली होती.
मृत राजू बोराडे यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनंतर सासवड पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.
advertisement
तपासादरम्यान घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासण्यात आले. या फुटेजमध्ये मृत व्यक्तीसोबत दोन अनोळखी व्यक्ती घटनास्थळाकडे जाताना स्पष्टपणे दिसून आल्या.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी कोंढवा, हडपसरसह पुणे शहरातील विविध भागांत शोध मोहीम राबवली. दरम्यान, सासवडमधील आनंद वाईन्स येथे दारू खरेदीसाठी आलेल्या एका संशयित व्यक्तीवर पोलिसांची नजर पडली. चौकशी केली असता त्याने आपले नाव सुरज प्रकाश बलराम निषाद असल्याचे सांगितले. मात्र त्याच्या उत्तरांमध्ये तफावत आढळून आल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली.
advertisement
अखेर सुरज निषादने आपला साथीदार नीरज गोस्वामी याच्यासह राजू बोराडे यांचा दारूच्या नशेत झालेल्या वादातून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर नीरज गोस्वामीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. नीरज गोस्वामीने काही आठवड्यांपूर्वी जामखेड येथे पैशांच्या वादातून विकास मधुकर अंधारे (वय २२) याचा खून केल्याची कबुली दिली. त्या घटनेनंतर तो पुणे जिल्ह्यात कामाच्या शोधात आला होता आणि सासवडमध्ये दुसऱ्या खुनाची घटना घडली. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाद झाला, दारूच्या नशेत थेट खून केला, दुहेरी हत्याकांडांचा असा झाला पर्दाफाश
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement