Indian Railway : रेल्वेने प्रवास करताय? मग बॅगा भरण्यापूर्वी हे नियम वाचा, आता जास्तीच्या सामानासाठी मोजावे लागणार पैसे
- Published by:Devika Shinde
Last Updated:
विमानतळावर ज्याप्रमाणे जास्त वजनाच्या बॅगेसाठी जादा पैसे मोजावे लागतात, अगदी तसाच नियम आता रेल्वे प्रवाशांसाठीही कडक केला जात आहे. नुकतेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावर महत्त्वाची माहिती दिली आहे.
भारतीय रेल्वेने प्रवास करणं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असोत किंवा दिवाळी-गणपतीचे सण, गावी जाताना लोक हाच पर्याय स्वीकारतात कारण हा प्रवास कमी पैशात होतो आणि देशातील कोणत्याही कोपऱ्यात आपल्याला वेळेवर पोहोचवतो. ट्रेनने विमानापेक्षा जास्तीचा वेळ लागतो पण विमानाचे पैसे जास्त असतात शिवाय काही असेही नियम विमानातून प्रवास करताना पाळावे लागतात, ज्यामुळे प्रवाशांना जास्तीचे पैसे द्यावे लागतात. त्यापैकीच एक आहे लगेज मर्यादा.
advertisement
विमानातून प्रवास करताना प्रत्येक व्यक्तीच्या सामानासाठी एक विशिष्ट मर्यादा ठरवून दिलेली आहे आणि त्या मर्यादेतच सामान न्यावं लागतं आणि वजन जास्त झालं तर जास्त पैसे मोजावे लागतात. पण ट्रेनचं असं नाही. याने प्रवास करताना सामानाच्या वजनाची काही अट नाही. बॅग मोठी आहे का?, अजून एक पिशवी घेऊ का? अशा प्रश्नांवर आपलं उत्तर नेहमी 'हो' असतं. कारण रेल्वे आहे म्हटल्यावर कितीही सामान नेता येतं, असा आपला एक समज आहे. पण आता हा समज बदलण्याची वेळ आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
दंडाचे गणित कसे चालते?समजा तुम्ही AC फर्स्ट क्लासने प्रवास करत आहात. तुम्ही 70 किलोपर्यंत सामान मोफत नेऊ शकता. पण जर तुमचे सामान 80 किलो असेल, तर वरच्या 10 किलोसाठी तुम्हाला सामान्य दराच्या 1.5 पट जास्त शुल्क मोजावे लागेल. लक्षात ठेवा, तुम्ही १५० किलोच्या वर सामान कोणत्याही परिस्थितीत डब्यात नेऊ शकत नाही.
advertisement
बॅगेचा आकारही महत्त्वाचाफक्त वजनच नाही, तर तुमच्या बॅगेचा आकारही रेल्वेच्या नियमात बसणारा असावा लागतो. तुमच्या ट्रंक किंवा सूटकेसचा आकार 100 सेमी x 60 सेमी x 25 सेमी पेक्षा जास्त नसावा. जर तुमची बॅग या आकारापेक्षा मोठी असेल, तर ती तुम्हाला डब्यात सोबत ठेवता येणार नाही. अशा बॅगा तुम्हाला 'ब्रेक व्हॅन' किंवा 'पार्सल व्हॅन' मध्ये बुक करून पाठवाव्या लागतील.
advertisement
advertisement








