SUV आणि XUV मध्ये काय आहे फरक? आताच दूर करा गाड्यांशी संबंधीत हे कन्फ्यूजन
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खूप वेळा लोक मोठ्या आकाराची गाडी घेतात पण नंतर त्यांना कळतं की ही आपल्या गरजेची नाहीये. म्हणूनच, लाखो रुपये खर्च करण्यापूर्वी या चार महत्त्वाच्या कॅटेगरीमधील फरक समजून घेणं गरजेचं आहे.
आजकाल स्वतःची हक्काची कार असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. सण-सुदीला किंवा सुट्टीच्या दिवशी जेव्हा आपण सहकुटुंब शोरूममध्ये जातो, तेव्हा सेल्समन आपल्यासमोर SUV, MUV, XUV आणि TUV अशा शब्दांचा भडिमार करतो. यांपैकी SUV आणि XUV हे शब्द आपण ऐकून आहोत. पण त्यातील फरक सांगता येत नाही. सामान्य ग्राहकाला वाटतं की या सर्व गाड्या दिसायला तर मोठ्याच आहेत, मग यात नक्की फरक काय?
advertisement
advertisement
1. SUV (Sports Utility Vehicle): साहसी सफरीसाठी बेस्टजर तुम्हाला डोंगराळ रस्ते, कच्चे रस्ते किंवा ऑफ-रोडिंगची आवड असेल, तर SUV हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.या गाड्यांचे 'ग्राउंड क्लीयरेंस' (जमिनीपासूनची उंची) जास्त असते. त्यामुळे खराब रस्त्यांवर गाडी खालून घासण्याची भीती नसते.यामध्ये दमदार इंजिन आणि बऱ्याचदा 4WD (Four Wheel Drive) चा पर्याय असतो, जो चिखलातून किंवा खडकाळ रस्त्यावरून गाडी काढण्यास मदत करतो. ज्यांना पावर आणि अ‍ॅडव्हेंचर आवडते त्यांच्यासाठी ही गाडी उत्तम आहे.
advertisement
2. MUV (Multi Utility Vehicle): मोठ्या कुटुंबाचा आधारजर तुमचा उद्देश कुटुंबाला आरामात फिरवणे आणि जास्त सामान नेणे हा असेल, तर डोळे मिटून MUV निवडा. यामध्ये साधारणपणे 7 ते 8 लोकांची बसण्याची सोय असते. या गाड्या डिझाइन करताना 'केबिन कम्फर्ट'ला जास्त महत्त्व दिले जाते. लांबच्या प्रवासासाठी किंवा मोठ्या कुटुंबासाठी ही गाडी एखाद्या फिरत्या घरासारखी असते. ज्यांना कम्फर्ट आणि जास्त सीटिंग कपॅसिटी हवी आहे त्यांच्यासाठी.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










