Suryakumar Yadav : रोहित-विराटनंतर आता सूर्यावर गदा, कॅप्टनचा एक्झिट प्लान लिक, हकालपट्टी होणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा शनिवार 20 डिसेंबरला करण्यात येणार आहे. टी-20 वर्ल्ड कपची टीम जाहीर व्हायला 24 तासही शिल्लक नसताना बीसीसीआयने मोठा बॉम्ब टाकला आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा शनिवार 20 डिसेंबरला करण्यात येणार आहे. टी-20 वर्ल्ड कपची टीम जाहीर व्हायला 24 तासही शिल्लक नसताना बीसीसीआयने मोठा बॉम्ब टाकला आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर सूर्यकुमार यादव भारताच्या टी-20 टीमचा कर्णधार नसेल, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
बीसीसीआय टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय भारतीय टीमची घोषणा शनिवार 20 डिसेंबरला करणार आहे. या टीमचं नेतृत्व 35 वर्षांच्या सूर्यकुमार यादव याच्याकडे असेल, पण वर्ल्ड कपनंतर मात्र सूर्या टीमचा कर्णधार नसेल, असं पीटीआयने सांगितलं आहे. टी-20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत होणार आहे. बीसीसीआय टीमची निवड इतक्या लवकर करणार असली तरी त्यांना 7 फेब्रुवारी म्हणजेच वर्ल्ड कप सुरू होईपर्यंत टीममध्ये बदल करण्याची परवानगी असेल.
advertisement
टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म हा भारतीय टीमसाठी मोठा चिंतेचा विषय आहे, कारण गेल्या 14 महिन्यांहून अधिक काळापासून सूर्या बॅटने कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्याच्या फॉर्मवर अनेक वेळा टीका झाली आहे; तसंच सूर्यकुमार यादव कर्णधार असल्यामुळेच टीममध्ये असल्याचंही बोललं गेलं. सूर्यकुमार यादव एका वर्षापेक्षा जास्त काळ संघर्ष करत आहे. त्यातच अनेक युवा आणि प्रतिभावान खेळाडू टी-20 टीममध्ये स्थान मिळवण्याची वाट पाहत आहेत.
advertisement
निवड समिती आणि बीसीसीआय याबाबत मौन बाळगून असली, तरी ड्रेसिंग रूममधून मात्र याबाबत संदेश येण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनेही त्याच दिशेने संकेत दिले आहेत. शुभमन गिल टीम इंडियाच्या सर्व फॉरमॅटचा कर्णधार होईल, असं बोललं जात आहे.
जयस्वाल बॅकअप ओपनर
शुभमन गिल त्याच्या खराब फॉर्ममुळे टीममध्ये त्याचे स्थान कायम ठेवत आहे, त्याचं मुख्य कारण म्हणजे तो उपकर्णधार आहे, तसंच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा गिलवर प्रचंड विश्वास आहे. पण, यशस्वी जयस्वालही प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहे.
advertisement
जयस्वालने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरिजमध्ये प्रभावी कामगिरी केली. सीरिजमध्ये जयस्वाल सर्वाधिक रन करणारा भारताचा दुसरा खेळाडू होता. तसंच त्याच्या बॅटिंगमध्ये गिल आणि संजूपेक्षा जास्त वैविध्य आहे, हेदेखील जयस्वालने दाखवून दिलं आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये जयस्वालची निवड होते का? त्याआधी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये जयस्वालची चाचणी घेतली जाते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
रिंकूसाठी सुंदरला डच्चू?
टीम इंडियामध्ये सध्या वॉशिंग्टन सुंदर हा कमकुवत दुवा वाटत आहे, जो बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही प्रभावी ठरत नाहीये. तसंच टीममध्ये त्याची कोणतीही विशिष्ट भूमिकाही नाहीये. अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे तिघे आधीच टीममध्ये असल्यामुळे सुंदरची टी-20 टीममध्ये निवड होणार, का रिंकू सिंगला संधी मिळणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 9:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : रोहित-विराटनंतर आता सूर्यावर गदा, कॅप्टनचा एक्झिट प्लान लिक, हकालपट्टी होणार!










