आई-वडिलांचं छत्र हरपलं, दोघा भावांनी माळरानाला फोडला पाझर, आता वर्षाची कमाई 30 लाखांची!
- Reported by:Shubham Sharad Bodake
- Published by:News18 Marathi
Last Updated:
ज्या जमिनीवर जनावरांना चरण्यासाठी दूरदूरपर्यंत झुडूपं नव्हती, त्या जमिनीवर जाधव बंधूंनी नंदनवन फुलवण्याची किमया केली. घरात सायकलसुद्ध नव्हती, आता ते 5 गाड्यांचे मालक आहेत.
आता शेतकरी बांधव पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन चांगलं उत्पन्न मिळवू लागले आहेत. अनेक शेतकरी भाजीपाला, फळबाग आणि फुलबागेतून लाखोंचं उत्पन्न कमवतात. याचंच उत्तम उदाहरण साताऱ्यातील एका खेडेगावात राहणारे जाधव बंधू आहेत. या बंधूंनी पडक्या माळरानावर प्रचंड कष्ट घेऊन जणू सोनं उगवलं. आज या शेतीतून ते लाखो रुपयांचं उत्पादन घेतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ज्या जमिनीवर जनावरांना चरण्यासाठी दूरदूरपर्यंत झुडूपं नव्हती, त्या जमिनीवर त्यांनी नंदनवन फुलवण्याची किमया केली. नापीक जमिनीला सुपीक करण्यासाठी अर्धा किलोमीटर लांब जाऊन पाणी आणलं. या अंतरात सावली मिळवायला एखादं झाडही नव्हतं. अशा या रानावर आज त्यांनी 40 आंब्याची, 20 नारळाची, चिकू, सफरचंद, अंजीर, सिताफळ, इत्यादी अनेक झाडांची लागवड करून फळबाग फुलवली आहे.
advertisement
advertisement









