पारंपारिक पिकाला दिला फाटा अन् केली गुलाब शेती, आता शेतकरी करतोय लाखोंची कमाई
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
पोपट साळुंखे असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे. ते सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावातील रहिवासी आहेत. गुलाब फुल शेती फायद्याची शेती आहे. आपल्याकडे लग्न कार्यात आणि इतर अनेक छोट्या मोठ्या समारंभात सुगंधी द्रव्यांचा, पत्रांचा व गुलाब पाण्याचा वापर करतात. वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी फुलातील सुगंधी द्रव्यांचा उपयोग होतो.
advertisement
त्यामुळे अवकाळी पाऊस, वादळ, ओला दुष्काळ अशा अनेक समस्येला समोर जाऊन शेतकऱ्याला आपली पिके तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपावे लागते. इतके जपूनही त्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे. अशातच एका शेतकऱ्याने पारंपारिक शेतीला फाटा देत, शेतीमध्ये अभिनव उपक्रम करून आपले उत्पन्न वाढवले आहे. आज जाणून घेऊयात, त्यांची ही प्रेरणादायी कहाणी.
advertisement
पोपट साळुंखे असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे. ते सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावातील रहिवासी आहेत. गुलाब फुल शेती फायद्याची शेती आहे. आपल्याकडे लग्न कार्यात आणि इतर अनेक छोट्या मोठ्या समारंभात सुगंधी द्रव्यांचा, पत्रांचा व गुलाब पाण्याचा वापर करतात. वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी फुलातील सुगंधी द्रव्यांचा उपयोग होतो.
advertisement
तसेच गुलाब फुलापासून तयार केलेले सुगंधी द्रव्यांचा वापर स्नो, सुगंधी तेले, साबण व औषधे यांच्या निर्मितीमध्ये करतात. गुलाबाच्या फुलांचा उपयोग गुलाबपाणी, अत्तर तयार करण्यासाठी होतो. गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद तयार करतात. अलीकडे गुलाब फुलांचा उपयोग सजावट, गुच्छ, हारतुरे करण्यासाठी वाढला आहे. पोपट साळुंखे हे मागील 40 वर्षांपासून शेती करत आहेत. त्यांनी आपल्या शेतामध्ये अनेक पिकांचे उत्पादन घेतले. पारंपारिक पद्धतीला फाटा देत त्यांनी आपल्या 30 गुंठे क्षेत्रामध्ये पाकळी गुलाब लावण्याचा निर्णय घेतला. हा गुलाब गुलकंद न करता व्यापारी वर्ग शेतातून घेऊन जातात.
advertisement
या गुलाबाचा तोडा दोन दिवसानंतर करण्यात येतो. एका वेळीच्या तोड्यामध्ये 40 ते 50 किलो गुलाबाची तोडणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. या 30 गुंठे क्षेत्रात चार मजूर लावून हे गुलाबाची फुले तोडण्यात येतात. दादासाहेब साळुंखे यांनी 3 वर्षांपूर्वी पासून गुलाबाची शेती करण्यास सुरुवात केली. शेतामध्ये नवीन काहीतरी उपक्रम करण्याचा मानस मनामध्ये ठेवून त्यांनी आपल्या शेतामध्ये गुलाबाची लागवड केली. त्यांनी लावलेला गुलाबाचा वापर गुलकंद बनवण्यासाठी करतात, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
पाकळी गुलाबाची लागवड त्यांनी आपल्या 30 गुंठे शेतात केली आहे. 3 वर्षात त्यांनी आत्तापर्यंत 50 ते 60 गुलाबाच्या तोडी केल्या आहेत. त्यामधून महिन्याला चाळीस हजार रुपये इतके उत्पादन त्यांनी घेतले. कमी खर्चात, कमी वेळेत जास्त उत्पन्न या गुलाबाची शेतीतून मिळते. कोणत्याही केमिकल किंवा औषधाची फवारणी करत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे संपूर्ण सेंद्रीय गुलाब असल्याने व्यापारी वर्ग शेताच्या बांधावरून गुलकंद बनवण्याकरिता घेऊन जातात. त्यामुळे शेतकऱ्याला वर्षाकाठी 4 ते साडेचार लाख रुपयांचा फायदा या गुलाब शेतीतून होत असल्याचे त्यांनी सांगितले.