साताऱ्यातील शेतकरी शेती प्रॉडक्ट्सची करतो 9 राज्यांमध्ये विक्री, वर्षाला करतोय 30 लाखांची कमाई
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
श्रीकांत घोरपडे हे सातारच्या निसराळे येथील एमबीए पदव्युत्तर. ऊस आणि कांदा पिकाचं सातत्यपूर्ण उत्पादन घेण्याबरोबरच यशस्वी उद्योजक म्हणून तरुण शेतकऱ्यांपुढे त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.
advertisement
advertisement
श्रीकांत घोरपडे हे सातारच्या निसराळे येथील एमबीए पदव्युत्तर. ऊस आणि कांदा पिकाचं सातत्यपूर्ण उत्पादन घेण्याबरोबरच यशस्वी उद्योजक म्हणून तरुण शेतकऱ्यांपुढे त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी कांद्याचं 18 टन एकरी उत्पादन घेतलं आणि रब्बी कांद्याची साठवण करण्यासाठी 25 टन क्षमतेच्या कांदा साठवण गृहाची उभारणी शेतात केली. एवढंच नाही, तर बाजारपेठेचा अभ्यास करून ते कांद्याची विक्री करतात.
advertisement
advertisement
शतावरी कल्प, लहान मुलांसाठी सत्वफल, खेळाडूंसाठी टॉनिक वीटा, शतावरी कुकीज, अश्वगंधा पावडर, शतावरी पावडर, सुंठ, हळद पावडर, लेमन ग्रास, आवळा कॅन्डी, अशी 15 हून अधिक प्रकारची उत्पादनं या कंपनीत बनवली जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते या प्रॉडक्ट्सची जाहिरात करतात. तसंच कृषी विभागाकडून आयोजित केलेल्या विविध प्रदर्शनांमध्येही ते सहभागी होतात. त्यामुळे त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला उत्तम मागणी मिळते.
advertisement
श्रीकांत घोरपडे यांच्या शेतात तयार केलेले प्रॉडक्ट्स आज 9 राज्यांमध्ये पाठवले जातात. त्यांच्या कंपनीत सध्या 5-6 कामगार कार्यरत आहेत. तर, कंपनीची वार्षिक उलाढाल 30 लाखांहून जास्त आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रॉडक्ट्स पर्यावरणपूरक असल्यानं त्यांना मोठी मागणी मिळते, आता ते सातासमुद्रापार पोहोचवण्याचं स्वप्न श्रीकांत घोरपडे यांनी पाहिलं आहे.


