AC खरेदी करताना 'या' गोष्टी विचारात घ्या, पैसे फुल्ल वसूल होतील!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Air Conditioner Buying Tips: उन्हाळा येताच AC आणि Coolerची मागणी वाढते. सध्या तर उकाडा प्रचंड वाढलाय. तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. एसी खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या हे आज आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही, झाला तर फायदाच होईल. (रिया, प्रतिनिधी / दक्षिण दिल्ली)
advertisement
advertisement
advertisement
मार्केटमध्ये इनव्हर्टर आणि नॉन इनव्हर्टर अशा दोन प्रकारचे एसी मिळतात. इनव्हर्टर एसीमध्ये व्हेरिएबल स्पीड कंप्रेसर असतं. जे तापमान कंट्रोल करून आपल्या हिशोबाने खोलीत गारवा निर्माण करतं. तर, नॉन इनव्हर्टर एसीमध्ये फिक्सिड स्पीड कंप्रेसर असतं. जे गरजेनुसार सुरू आणि बंद होतं. दरम्यान, नॉन इनव्हर्टरच्या तुलनेत इनव्हर्टर एसीमुळे वीजेची जास्त बचत होते.
advertisement









