तुमच्या खात्यावर पैसे आले की नाही? लाडकी बहीणचे पैसे जमा व्हायला सुरुवात, आदिती तटकरेंनी दिली अपडेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आले रे आले लाडकी बहीणचे पैसे आले! तुमच्या खात्यावर नाही आले मग लगेच चेक करा का? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट
advertisement
advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना दमदार वाटचाल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ज्या महिलांनी ई-केवायसी करताना काही चुका केल्या आहेत किंवा ज्यांचे उत्पन्न निकषापेक्षा जास्त असल्याचे चुकीने नमूद झाले आहे, त्यांना दुरुस्तीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंतची शेवटची संधी देण्यात आली आहे.
advertisement
ज्यांनी अद्याप ई-केवायसी दुरुस्त केलेले नाही, त्यांनी तातडीने मोबाईल किंवा सेतू केंद्रावरून ही प्रक्रिया पूर्ण करावी. जर ३१ मार्चपर्यंत ही दुरुस्ती झाली नाही, तर तुमचा पुढचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो. त्यामुळे आता फक्त काहीच दिवस शिल्लक असल्याने ही कामे तातडीने उरकून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
advertisement








