MPSC परीक्षेत 'हरला' पण व्यवसायामध्ये जिंकला, तरुण आता सरकारी नोकरीपेक्षा कमावतो जास्त!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या शिवाजी आवटे या तरुणाने तब्बल 8 वर्षे पोलिस भरती, आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा दिली. मात्र, यश मिळाले नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्यांच्या नाश्ता सेंटरमध्ये दही पोहे, समोसा राईस, मटकी, शिरा यासह अनेक पदार्थ या ठिकाणी मिळतात. या नाश्ता सेंटरच्या माध्यमातून 4 ते 5 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे आवटे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. त्यांच्या नाश्ता सेंटरमध्ये 11 कामगार आहेत. त्यांना देखील कामाच्या माध्यमातून चांगला रोजगार मिळाला आहे आणि ते समाधान व्यक्त करत आहेत.
advertisement
नाश्ता सेंटर व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवटे यांनी काही महत्त्वाचे मंत्र सांगितले आहेत. त्यांच्या मते या व्यवसायात येऊ पाहणाऱ्या तरुणांनी पदार्थांची क्वालिटी चांगली ठेवणे आणि ग्राहकांशी संवाद चांगला ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकदा ग्राहक आपल्या पदार्थांच्या चवीने आणि वागणुकीने आकर्षित झाले की ते वारंवार आपल्याकडेच येतात.