Mumbai Rain : मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव मुंबईवर, मुसळधार कोसळला पाऊस, या भागात वीजपुरवठा खंडित
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा सुरू असूनही मुंबईवर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी सकाळपासूनच शहराच्या विविध भागांत विशेषतः साऊथ मुंबईतील ब्रीच कॅण्डी, नरीमन पॉईंट आणि फोर्ट परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा सुरू असूनही मुंबईवर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी सकाळपासूनच शहराच्या विविध भागांत विशेषतः साऊथ मुंबईतील ब्रीच कॅण्डी, नरीमन पॉईंट आणि फोर्ट परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या क्षेत्रीय केंद्रानं मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह (30 ते 40 किमी प्रतितास) विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
advertisement
आज 28 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झालाय. तर याचा फटका साऊथ मुंबईला बसला असून या पावसामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी फोर्ट परिसरातील वीज गेल्याची माहिती शेअर केली. तसेच ब्रीच कॅण्डी आणि नरीमन पॉईंट परिसरातूनही पावसाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्यात आले आहेत.
advertisement
advertisement
अनियमित ऑक्टोबरच्या पावसामुळे शहराचं तापमान खाली आलं असून हवेची गुणवत्ता सुधारली आहे. आज कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार (CPCB) कोलाबा येथे एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 142 (मध्यम श्रेणी) इतका नोंदवला गेला आहे. नेव्ही नगर, मझगाव, वर्ली येथे अनुक्रमे 61, 76 आणि 63 इतका AQI असून सिद्धार्थ नगर वर्ली येथे 49 (चांगली श्रेणी) अशी नोंद झाली आहे.
advertisement
दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं गंभीर चक्रीवादळ मोंथा आज संध्याकाळी ते रात्री दरम्यान आंध्रप्रदेश किनारपट्टीवर (माचिलीपटनम आणि काकीनाडा दरम्यान) धडकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या वादळामुळे आंध्रप्रदेश, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, आणि ओडिशा येथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळेच हवामान खात्यानुसार, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये 30 ऑक्टोबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली आहे.


