Lemon vs Lime : लिंबू आणि लेमनमध्ये फरक काय? तुम्ही देखील दोघांना एकच समजण्याची चूक करत असाल तर आधी हे वाचा

Last Updated:
काहीजण “लाईम” (Lime) आणि “लिंबू” या दोन्हीना एकच समजतात. पण तुम्हाला माहितीय का, हे दोन्ही एकाच प्रजातीचे असले तरी पूर्णपणे वेगळे फळ आहेत? चला दोघांमधील नेमका फरक काय हे जाणून घेऊ.
1/8
आपण सगळेच लिंबू पाण्याचं, लिंबू सरबताचं किंवा लिंबाच्या लोणच्याचं नाव ऐकलं आहे. मराठीत आपण त्याला “लिंबू” म्हणतो, पण इंग्रजीत यालाच Lemon म्हणतात. मात्र, काहीजण “लाईम” (Lime) आणि “लिंबू” या दोन्हीना एकच समजतात. पण तुम्हाला माहितीय का, हे दोन्ही एकाच प्रजातीचे असले तरी पूर्णपणे वेगळे फळ आहेत? चला दोघांमधील नेमका फरक काय हे जाणून घेऊ.

advertisement
2/8
लिंबू म्हणजे काय?लिंबू हा मोठा, पिवळसर आणि थोडासा लांबट अंडाकृती आकाराचा फळ असतो. हा आपण घराघरांत पाहतो. सरबत, डिटॉक्स वॉटर, लिंबाचं लोणचं किंवा स्वयंपाकात चव वाढवण्यासाठी वापरला जातो. त्याचा रस थोडासा आंबट पण किंचित गोडसर लागतो. लिंबूमध्ये व्हिटॅमिन C ची प्रचंड मात्रा असते, जी आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि त्वचेसाठीही फायदेशीर असते.

3/8
लाईम म्हणजे काय?लाईम (Lime) हे दिसायला लहान, गोल आणि गडद हिरव्या रंगाचं असतं. काही भागात त्याला ‘डब्बाकाया’ असंही म्हणतात. त्याची चव लिंबूपेक्षा जास्त आंबट आणि तीव्र असते. सुगंधानेही तो अधिक तीव्र आणि कधी थोडासा कडवट वाटतो. याच कारणामुळे लाईमचा वापर लोणचं, आंतरराष्ट्रीय सॉस, कॉकटेल किंवा सॅलड ड्रेसिंगमध्ये मोठ्या प्रमाणात होतो.

4/8
या शिवाय दोघांच्या पौष्टिकतेतही फरकदोन्ही फळं आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन C चं प्रमाण जास्त असल्याने ते इम्युनिटी वाढवण्यासाठी, कोलेजन निर्मितीसाठी आणि सर्दी-खोकला टाळण्यासाठी उपयुक्त ठरतं.
लाईममध्ये फ्लेवोनॉइड्स नावाचे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे पचन सुधारतात आणि शरीरातील सूज कमी करण्यात मदत करतात.
दोन्हीमध्ये असलेले नैसर्गिक आम्ल (Citric Acid) शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून डिटॉक्सिफिकेशन मध्ये मदत करतात.
या शिवाय दोघांच्या पौष्टिकतेतही फरकदोन्ही फळं आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.लिंबूमध्ये व्हिटॅमिन C चं प्रमाण जास्त असल्याने ते इम्युनिटी वाढवण्यासाठी, कोलेजन निर्मितीसाठी आणि सर्दी-खोकला टाळण्यासाठी उपयुक्त ठरतं.लाईममध्ये फ्लेवोनॉइड्स नावाचे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे पचन सुधारतात आणि शरीरातील सूज कमी करण्यात मदत करतात.दोन्हीमध्ये असलेले नैसर्गिक आम्ल (Citric Acid) शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून डिटॉक्सिफिकेशन मध्ये मदत करतात.
advertisement
5/8
कधी आणि कसा वापर करावा?सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीर स्वच्छ राहते आणि ऊर्जा मिळते.
लाईमचा रस लोणचं, थंड पेय किंवा सॅलेडमध्ये चव वाढवण्यासाठी करु शकता.
कधी आणि कसा वापर करावा?सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीर स्वच्छ राहते आणि ऊर्जा मिळते.लाईमचा रस लोणचं, थंड पेय किंवा सॅलेडमध्ये चव वाढवण्यासाठी करु शकता.
advertisement
6/8
लिंबाचा जेस्ट (साल किसून घेतलेला भाग) बेकिंग आणि स्वीट डिशमध्ये वापरतात, तर लाईमचा जेस्ट पेयांमध्ये सुगंध वाढवतो.

7/8
लिंबू आणि लाईम हे दिसायला जरी सारखे वाटले तरी त्यांचा रंग, आकार, सुगंध, चव आणि पोषक मूल्य यात स्पष्ट फरक आहे. आरोग्यासाठी दोन्हीच उपयुक्त आहेत. त्यामुळे, रोजच्या आहारात कधी लिंबू, तर कधी लाईम अशी बदलती साथ ठेवा. दोन्हींचं सेवन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी एकदम परफेक्ट उपाय आहे.

8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement