Mumbai-Pune Expressway Traffic Jam : अरे देवा! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा वाहतूक कोंडी; प्रवास करणाऱ्यांची डोकेदुखी कायम; पाहा PHOTO
Last Updated:
Heavy Traffic On Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून चाकरमानी प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला आहे.
advertisement
advertisement
दिवाळीच्या सुट्ट्या, सरकारी आणि स्थानिक सुट्ट्यांचा संगम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी जाण्यासाठी निघाले आहेत. अनेक प्रवासी आणि हौशी पर्यटक लोणावळा-खंडाळा परिसरात फिरण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे एक्सप्रेसवेवर अचानक वाहतूक वाढली असून प्रवासाचा वेळ दुप्पट झाला आहे. वाहनांच्या लांब रांगा पाहून प्रवाशांचा संयम सुटला आहे आणि काही जण पर्यायी मार्गांकडे वळले आहेत.
advertisement
एक्सप्रेसवेवरील कोंडी टाळण्यासाठी काही वाहनचालक खोपोलीहून मुंबई-पुणे जुन्या महामार्गाने, म्हणजेच बोरघाटमार्गे लोणावळा कडे जात आहेत. परंतु त्यामुळे दस्तुरी आणि अंडा पॉईंट परिसरातही मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. या ठिकाणीही वाहनांच्या लांब रांगा लागल्याने जुना महामार्ग सुद्धा ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे.