Mumbai Local: ऐन दिवाळीत मुंबईकरांचा खोळंबा, मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? संपूर्ण माहिती

Last Updated:

Mumbai Local: मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक जाहीर केल्याने ऐन दिवाळीत मुंबईकरांचा खोळंबा होणार आहे. या काळात काही लोकल बंद राहतील.

Mumbai Local: ऐन दिवाळीत मुंबईकरांचा खोळंबा, मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? संपूर्ण माहिती
Mumbai Local: ऐन दिवाळीत मुंबईकरांचा खोळंबा, मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? संपूर्ण माहिती
मुंबई: ऐन दिवाळीत मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे  हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिवाळीत खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा या ब्लॉकमुळे खोळंबा होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र वीकेंडला कोणताही ब्लॉक नाही.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 8 ते दुपारी 1.30 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर खोळंबा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4.40 या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते पनवेल मार्गावरील सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 या वेळेत बंद राहील. तसेच सीएसएमटीहून वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकसेवा देखील 10.48 ते 4.43 या वेळेत बंद असेल. पनवेल ते सीएसएमटी मार्गावरील लोकल सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत आणि गोरेगाव/वांद्रे येथून सुटणाऱ्या अप मार्गावरील लोकल सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत बंद राहतील.
advertisement
दरम्यान, हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चावलण्यात येणार आहेत.
कांजूरमार्गला मध्यरात्री पॉवर ब्लॉक
कांजूरमार्ग येथील स्थानकावरचा कल्याणच्या दिशेचा पादचारी पूल हटवण्यासाठी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 12 ते रविवारी पहाटे 5 दरम्यान अप व डाउन धिम्या आणि जलद मार्गावर, तसेच पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर हा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे रात्रीच्या वेळी विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर या स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही.
advertisement
ब्लॉक काळात रात्री 11.40 वाजता असणारी ठाणे ते कुर्ला, पहाटे 4.04 वाजताची ठाणे – सीएसएमटी आणि रात्री 11.38 आणि 12.24 वाजताची सीएसएमटी – ठाणे लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: ऐन दिवाळीत मुंबईकरांचा खोळंबा, मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? संपूर्ण माहिती
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement