Mumbai Railway: CSMT अन् LTT चा ताण कमी होणार, मुंबईसाठी रेल्वेचा गेमचेंजर प्लॅन
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Railway: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवरील ताण कमी करण्यासाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे महाराष्ट्रासह उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतातून लाखो लोक रोजगाराच्या शोधात येत असतात. या सतत वाढणाऱ्या प्रवासी संख्येचा भार केवळ मुंबई लोकलवरच नाही तर मेल–एक्स्प्रेस गाड्यांवरही मोठ्या प्रमाणात पडत आहे. हा वाढता ताण कमी करण्यासाठी परळ टर्मिनसचा विस्तार करण्यात येणार आहे. या ठिकाणी कुर्ला–परळ 5 व्या-6 व्या मार्गिकेशी जोडणीची मंजुरी मिळाल्याने हा टर्मिनस भविष्यात मोठ्या मेल–एक्स्प्रेस केंद्रात रुपांतरित होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे
advertisement
या प्रकल्पांतर्गत परळ टर्मिनसला आधुनिक पायाभूत सुविधा मिळणार आहेत. यात दोन आयलंड प्लॅटफॉर्म, चार 26 कोच क्षमतेच्या प्लॅटफॉर्म लाईन्स, तसेच दोन 620 मीटरच्या स्टेबलिंग लाईन्स समाविष्ट आहेत. त्यासोबत प्लॅटफॉर्म डेक वाढवणे, प्रवाशांच्या हालचालीसाठी अतिरिक्त जागा, पार्किंग, प्रवेशद्वार आणि प्रसाधनगृह यांसारख्या सुविधाही उभारल्या जातील.
advertisement
परळ स्थानकाचा विकास ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत केला जात आहे. या योजनेमध्ये स्टेशनचे आधुनिकीकरण, नवीन प्रतीक्षागृहे, सुलभ प्रवासी सुविधा, सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा, व्हीलचेअर अनुकूल मार्ग, लिफ्ट-एस्केलेटर यांसारख्या गोष्टींना प्राधान्य दिले गेले आहे. या उन्नतीकरणामुळे परळ स्टेशन प्रवाशांसाठी अधिक आरामदायी आणि आधुनिक होणार आहे.
advertisement
advertisement


