'अण्णा बाहेर येतोय', परळीत ऑडिओ क्लिप व्हायरल; शरद पवारांच्या उमेदवाराचा जीव धोक्यात
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अण्णा लवकरच बाहेर येत असून ते साहेबांच्या रडारवर आहेत, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत राहा असे, या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.
बीड : नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालाअगोदरच बीडमध्ये धमक्यांच सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी एका कार्यकर्त्याजवळ काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार दीपक देशमुख वाल्मिक कराडच्या रडारवर असल्याचे बोलतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
बीडच्या परळीत नगरपालिका निवडणूक मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँग रूम बाहेर गोंधळ घातल्याच्या प्रकरणात दीपक देशमुख यांच्यासह पंधरा ते वीस जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता दीपक देशमुख यांनी परळीतील प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहे, असा आरोप केला, त्यामुळे सातत्याने ते चर्चेत आहे. त्यानंतर आता दीपक देशमुख यांनी आता गौप्यस्फोट केला आहे.
advertisement
ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटलं आहे?
दिपक देशमुख यांनी रोजी पत्रकार परिषद घेत माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी आणि सुनील मस्के यांच्यात झालेल्या संभाषणाची क्लिप ऐकवत त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. तुम्ही दीपक देशमुख यांच्यासोबत राहू नका, अण्णा लवकरच बाहेर येत असून ते साहेबांच्या रडारवर आहेत, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत राहा असे, या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.
advertisement
सीडीआर तपसण्याची मागणी
बीडच्या परळी नगरपरिषद निवडणुकीनंतर मतदान यंत्र स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत. त्या ठिकाणी आम्हाला 24 तास थांबण्यासाठी परवानगी द्या.. गादी व पलंगासह प्रवेश द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. याच मागणीवरून त्यांनी स्ट्राँग रूम बाहेर जमाव एकत्र करत पोलीस अधिकाऱ्यांशी देखील वाद घातला होता.. या प्रकरणात आता पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून दीपक देशमुख यांच्यासह 15 ते 20 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या जीवाला धोका असून बाजीराव धर्माधिकारी यांचा सीडीआर तपसण्याची मागणी कली आहे.
advertisement
दीपक देशमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
स्ट्राँग रूम बाहेर थांबण्यासाठी रीतसर परवानगी मागितली होती परंतु ती दिली गेली नाही आम्ही त्या ठिकाणी थांबलेलो असताना पोलिसांनी आम्हाला हाकलून लावले असे देखील देशमुख यांनी म्हटले असून या प्रकरणाविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 07, 2025 9:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'अण्णा बाहेर येतोय', परळीत ऑडिओ क्लिप व्हायरल; शरद पवारांच्या उमेदवाराचा जीव धोक्यात


